पुणे, 3 डिसेंबर : वडापाव, पॅटीस हे पदार्थ अनेक ठिकाणी मिळतात. मुंबई, पुणे सारख्या महानगरांमध्ये तर अक्षरश: प्रत्येक भागात याचे स्टॉल आहेत. या सर्व विक्रेत्यांच्या गर्दीमध्ये आपले ग्राहक आणि एकसारखी सतत टिकवणे हे अवघड काम आहे. पुण्यातल्या गंज पेठ भागातील सोनल पॅटीसला हे जमलंय. गेल्या 48 वर्षांपासून सोनल पॅटीस पुणेकरांमध्ये लोकप्रिय आहे.
हातगाडीवर सुरुवात
सुरेश सुर्यवंशी यांनी 1974 साली एका हातगाडीवर हे पॅटीस विकण्यास सुरुवात केली होती. त्यांचं पॅटीस कमी कालावधीमध्ये चांगलंच लोकप्रिय झालं. त्यानंतर त्यांनी छोटसं रेस्टॉरंट सुरू केलं. आता या पॅटीसची किंमत 20 रुपये इतकी असली तरी ग्राहकांची इथं नेहमी गर्दी असते. दिवसभरात 400 पॅटीसची विक्री होते. याचाच अर्थ हातगाडीवर व्यवसाय सुरु केलेले सुर्यवंशी आता पॅटीसच्या जोरावर लखपती बनले आहेत.
30 वर्षांपासून कुणीच नाही जवळपास, पुणेकरांसाठी 'हा' समोसा आहे सर्वात खास
काय आहे वेगळेपण?
सूर्यवंशी यांनी त्यांना लखपती करणाऱ्या पॅटीसचं वेगळेपणही सांगितले आहे. ' पॅटीसमध्ये सहसा स्लाईसचा वापर केला जातो. आम्ही पाव वापरतो. या पावांमध्ये पॅटीसचे सारण भरुन ते डाळीच्या पिठांमध्ये तळतो. आमच्या पॅटीससोबत विशिष्ट चटणीही मिळते. आंबट, गोड आणि तिखट चटणीच्या चवीमुळे हे पॅटीस ग्राहकांना आवडते. यासोबतच आम्ही थोड्याशा उकडलेल्या तळलेल्या मिरच्या आणि कांदा देखील पॅटीस सोबत देतो.
भट्टी वडापावची चव सर्वांपेक्षा वेगळी, एकदा खाल्ला तर... Video
गुगल मॅपवरून साभार
सोनल पॅटीसला अनेक ग्राहक नियमित भेट देतात. लहान मुलांपासून वयोवृद्ध आजोबापर्यंत सर्वजण येथील ग्राहक आहेत. वरुन क्रिस्पी आणि आतून लुसलुशीत असं हे पॅटीस खाण्यासाठी ग्राहकांची नेहमी रांग असते. पुण्यातील गंज पेठेतील कस्तुरी चौकात सकाळी दहा ते दुपारी एक आणि संध्याकाळी सहा ते रात्री दहापर्यंत हे पॅटस मिळते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Local18, Local18 food, Pune