चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 2 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा राजकिय भूकंप झाल्याची माहिती मिळत आहे. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे डझनभर आमदार बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एव्हढच नाही तर अजित पवार विरोधी पक्षनेते पदाचा राजीनाम देणार असल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान, यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व बातम्या त्यांनी फेटाळून लावल्या आहेत. राष्ट्रवादी पक्ष फुटू शकतो असं तुम्हाला वाटतं आम्हाला नाही, असं विश्वास पवारांनी व्यक्त केला. ते पुण्यात माध्यमांशी संवाद साधत होते.
काय म्हणाले शरद पवार? अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी बंड केल्याचं विचारलं असता शरद पवारांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. मला आजच्या बैठकीचे नियोजन काय आहे, माहिती नाही. पण विरोधी पक्ष नेता म्हणून विधिमंडळाच्या सदस्यांची बैठक त्यांना बोलवण्याचा आधिकार आहे. त्यांनी बैठीक बोलवली आहे. काय चर्चा होइल हे रात्री माहिती घेउन सांगतो, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. तर सुप्रिया मुंबईवरुन पुण्याला यायला निघाल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष पदाविषयी आणि त्या संदर्भात संबधित मी 6 तारखेला बैठक बोलावली आहे. ज्यात संघटनात्मक बांधणी करण्यावर चर्चा करणार आहोत. संघटनेत बदल करण्याची गरज आहे का? यावर विचार होणार आहे. वाचा - राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट, अजित पवार घेणार अर्थमंत्रिपदाची शपथ? आज शपथविधी अजित पवारांनी काही सूचना दिल्या आहेत, त्यादेखील विचारात घेतल्या जातील. दिल्लीला मी पण गेलो ते पण गेले आणि जयंत पाटील पण गेले होते. पण अशोक पवार यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो. ते सगळ्यांच्या समोर बोलले की त्यांना संघटनेत काम करण्याची इच्छा आहे. बैठकीत निर्णय होईल मी एकटा घेतं नाही. पक्ष फुटू शकतो का तर असं तुम्हाला वाटतं आम्हाला नाही. चर्चा कोण घडवत आहे, माहिती नाही. पण आम्ही चर्चा करत नाहीत, असं बोलून बंडाचा दावा पवार यांनी फेटाळून लावला आहे.