पुणे, 18 एप्रिल : अजित पवार यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. जी काही चर्चा तुमच्या मनात आहे ती आमच्या मनात अजिबात नाही. कुणीतरी बातम्या पिकवतय यापेक्षा त्याला अधिक काही महत्व नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. ते पुरंदरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. शरद पवार म्हणाले की, मी आणि माझे सहकारी हे सगळे एक विचाराने राष्ट्रवादी कॅाग्रेस अधिक शक्तीशाली कसा करता येईल यासाठी काम करतोय. दुसरा कुठलाही विचार कुणाच्याही मनात नाही. याच्यानंतर माझा देहूला कार्यक्रम आहे. तिथून मी मुंबईला जाणार आहे असंही त्यांनी सांगितलं. Ajit Pawar : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, पण अजितदादा पुन्हा स्पष्टच बोलले मी वर्तमानपत्रात वाचल काहीतरी बैठक बोलवलीय पण मी अशी कुठलीही बैठक बोलवली नाही. आमचे प्रांताध्यक्ष त्यांच्या गावाला आहेत. तिथे मार्केट कमिटीच्या निवडणुका आहेत. तर अजित पवार त्यांच्या कामात आहेत. मार्गदर्शन करताहेत त्याशिवाय इतर कुणावरही ही जबाबदारी नाही असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
Ajit Pawar : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, पण अजितदादा पुन्हा स्पष्टच बोलले शरद पवार यांनी म्हटलं की, मी जे सांगतोय ते अध्यक्ष म्हणून सांगतोय. त्यापेक्षा काही महत्वाचं नाही. मी सांगितल्यानंतर त्याला फाटे फोडायचा अधिकार तुम्हाला नाही. देशपातळीवर विरोधकांची एकजूट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ठाकरे आले तेव्हा ही हीच चर्चा झाली. देशपातळीवर विरोधक एकत्र येऊन एक कार्यक्रम ठरवतील आणि मला असं वाटत आम्ही सगळे त्यात सहभागी होऊ. दरम्यान, नवीन सत्ता स्थापनसाठी अजित पवार,सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनजंय मुंडे चर्चा करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. इतर कोणत्याही नेत्याला यामध्ये सहभागी केले नाही. 4 बड्या नेत्यांकडून नवीन सत्ता स्थापन बाबत चर्चा सुरु असल्याचं सांगण्यात येतंय. त्यातच धनंजय मुंडे हे अजित पवार यांची भेट घेण्यासाठी मुंबईत पोहोचल्याने या चर्चांना उधाण आलेय. धनंजय मुंडे यांनी ऑल इज परफेक्टली वेल असं सूचक विधानही केलं आहे.