जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Ajit Pawar : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, पण अजितदादा पुन्हा स्पष्टच बोलले

Ajit Pawar : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, पण अजितदादा पुन्हा स्पष्टच बोलले

Ajit Pawar : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, पण अजितदादा पुन्हा स्पष्टच बोलले

Ajit Pawar Maharashtra Politics Updates : मलबार हिलवर असलेल्या देवगिरी या सरकारी बंगल्यात सामसूम वातावरण आहे. अजित पवार काल रात्रीपासून या बंगल्याकडे आलेले नाहीत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 एप्रिल : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे संपर्कात नसल्याच्या आणि ते भाजपसोबत सत्ता स्थापनेसाठी हालचाली करत असल्याच्या चर्चा गेल्या काही आठवड्यांपासून सुरू आहेत. यावर अजित पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली आहे. मीडियामध्ये ज्या काही बातम्या चालतायत त्या अफवा आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं. आठवड्याभरापूर्वी अचानक प्रकृती अस्वास्थ्यामुळे अजित पवार यांनी कार्यक्रम रद्द केले होते. त्यानंतर काल खारघरमध्ये घडलेल्या घटनेमुळे सासवडमधील कार्यक्रम रद्द केले. यानंतर पुन्हा या चर्चा सुरू झाल्या होत्या. अजित पवार म्हणाले की, ज्या काही मीडियामध्ये चालत आहे सगळ्या अफवा आहे . मी काल अनेकदा ट्विट करून सांगितले की ते साफ खोटे आहे. कोणी सह्या केल्या मला माहित नाही. मी माझं नेहमी प्रमाणे काम करत आहे. Ajit Pawar : ‘कुछ तो गडबड है’ अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावर पहिल्यांदाच असं घडलं, मोठी अपडेट   शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनीही या चर्चांवर प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले की, अजित पवार हे मविआतील प्रमुख नेते आहेत. अजितदादा भाजपमध्ये जाणार नाहीत. अजित पवार यांच्याबाबत भाजपकडून वावड्या उठवल्या जात आहेत. मविआ फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, नवीन सत्ता स्थापनेसाठी अजित पवार,सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनजंय मुंडे चर्चा करत असल्याची सूत्रांची माहिती. इतर कोणत्याही नेत्याला यामध्ये सहभागी केले नाही. 4 बड्या नेत्यांकडून नवीन सत्ता स्थापन बाबत चर्चा सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात