Home /News /pune /

सोन्याचा मास्क घेऊन शंकर कुऱ्हाडे यानं करून दिली या 'गोल्डमॅन'ची आठवण!

सोन्याचा मास्क घेऊन शंकर कुऱ्हाडे यानं करून दिली या 'गोल्डमॅन'ची आठवण!

पुण्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात पिंपरी-चिंचवड एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे.

    पुणे, 4 जुलै: पुण्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात पिंपरी-चिंचवड एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. पिंपरीत आणखी एक गोल्डमॅन (Goldman) उदयास आला आहे. शंकर कुऱ्हाडे असं त्यांचं नाव. शंकर कुऱ्हाडे यांनी चक्क सोन्याचा मास्क (Gold Mask) खरेदी केला आहे. या मास्कची किंमत तब्बल 2 लाख 89 हजार रुपये आहे. हेही वाचा...बारामतीत धोका आणखी वाढला, अजित पवार यांच्या दोन मित्रांना कोरोनाची लागण शंकर कुऱ्हाडे यांनी चक्क सोन्याचा मास्क खरेदी करून पुण्यातील पहिला गोल्डमॅन दत्ता फुगे याची सगळ्यांना आठवण करून दिली आहे. दत्ता फुगे यानं स्वत: साठी सुमारे एक कोटी 27 लाख रुपये किंमतीचा सोन्याचा शर्ट तयार करून घेतला होता. दरम्यान, दत्ता फुगे याची 4 वर्षांपूर्वी 12 जणांनी निर्घृण हत्या केली होती. धक्कादायक म्हणजे दत्ता फुगेच्या मुलासमोरच त्याची हत्या करण्यात आली होती. पुण्यातील सर्वाधिक धनाढ्य गोल्डमॅन अशी दत्ता फुगे याची ओळख होती. आता कोरोनाच्या काळात मात्र शंकर कुऱ्हाडे याचीच सर्वत्र चर्चा आहे. शंकर कुऱ्हाडे यांनी स्वत: साठी चक्क सोन्याचा मास्क तयार करून घेतला आहे. साडे पाच तोळे सोन्यापासून हे मास्क तयार करण्यात आले आहे. या मास्कची किंमत जवळपास 3 लाख रुपये आहे. सोन्याचे चाहते असलेले शंकर कुऱ्हाडे यांच्या अंगावर तब्बल 3 किलो सोन्याचे दागिने आहेत. त्यांच्या गळ्यात जाड सोन्याची चेन (Gold Chains), हाताच्या 10 ही बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या आणि मनगटावर सोन्याचं ब्रेसलेट आहे. हेही वाचा...देहविक्री करणारी तरुणी कोरोना पॉझिटिव्ह, तब्बल 1 डझन पोलिस कॉन्स्टेबल क्वारंटाईन शंकर कुऱ्हाडे यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की, कोल्हापूरमध्ये त्यांनी चांदीचा मास्क (Silver Mask) पाहिलेल्या एका व्यक्तीला पाहिलं होतं. त्यावरून त्यांना सोन्याचा मास्क बनवण्याची आयडिया सुचली. त्यांनी ही आयडिया एका सराफा व्यापारीला सांगितली आणि स्वत: साठी सोन्याचा मास्क तयार करून घेतला.
    First published:

    पुढील बातम्या