देहविक्री करणारी तरुणी कोरोना पॉझिटिव्ह, 2 अधिकाऱ्यांसह तब्बल 1 डझन कॉन्स्टेबल क्वारंटाईन

पोलिसांच्या ताब्यात असलेली देहविक्री करणारी तरुणीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या ताब्यात असलेली देहविक्री करणारी तरुणीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे.

  • Share this:
      कपिल श्रीमाली, (प्रतिनिधी) उदयपूर, 4 जुलै: पोलिसांच्या ताब्यात असलेली देहविक्री करणारी तरुणीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. त्यामुळे 2 अधिकाऱ्यांसह तब्बल 1 डझन कॉन्स्टेबल क्वारंटाईन करण्यात आलं आहे. राजस्थानातील (Rajasthan) उदयपूर (Udaipur) पोलिसांनी तीन महिला डीएसपीने दोन दिवसांपूर्वी पीटा कायद्यांतर्गत धडक कारवाई केली होती. या कारवाईत पोलिसांनी 10 तरुणांसह देहविक्री (Prostitution) करणाऱ्या सात तरुणींना अटक केली होती. सातपैकी एक तरुणी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Virus Positive)आढळून आली. त्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. कारण ही कारवाई पोलिसांच्या दोन पथकांनी केली. हेही वाचा...आईचा कोरोनामुळे मृत्यू; रुग्णालय प्रशासन मुलाला म्हणालं, पोतडीत घेवून जा मृतदेह एक जुलै रोजी रात्री सुखेर पोलिस स्टेशनच्या हद्दीत हॉटेल रामलखनवर डीएसपी चेतना भाटी यांच्या नेतृत्त्वात पोलिसांच्या एक पथकानं छापा टाकला होता. देहविक्री करणाऱ्या (Sex Racket)चार तरुणींसह सात तरुणींना पोलिसांनी अटक केलं होतं. या सर्व तरुणींना पोलिस रिमांडमध्ये ठेवण्यात आलं होतं. यावेळी सर्व तरुणींची कोरोना टेस्ट करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या तरुणींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस लाईनमधील चार महिला कॉन्स्टेबलला तैनात करण्यात आलं होतं. दरम्यान, एका तरुणीचा कोरोना रिपोर्च पॉझिटिव्ह आला. त्यानंतर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईत सहभागी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. एएसपी गोपाल स्वरूप मेवाडा यांनी सांगितलं की, डीएसपी चेतना भाटी यांच्या नेतृत्त्वात सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याच बरोबर सुखेर आणि घंटाघर पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. आतापर्यंत एक डीएसपी, दोन एसएचओ आणि 11 पोलिस कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. हेही वाचा...कोरोनानं गेली फाईव्ह स्टारची नोकरी, मातीच्या 'ओव्हन'मध्ये करून विकत आहेत पिझ्झा कोरोना पॉझिटिव्ह तरुणी दिल्लीची... पोलिस कर्मचाऱ्यांच्या दोन कोरोना टेस्ट घेण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह तरुणी दिल्लीची रहिवासी आहे. सध्या तिची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मात्र, तरुणीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं आता पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. पोलिसांनी तिचा शोध सुरू केला आहे. दुसरीकडे संबंधित तरुणी उदयपूरच्या बाहेर गेल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस तिचा मोबाईल लोकेशन ट्रेस करत आहेत.
    First published: