बारामती, 4 जुलै: राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात कोरोनामुक्त झालेल्या बारामतीत कोरोनाचा आणखी धोका वाढला आहे. शनिवारी एकाच दिवशी सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. शहरातील वकीलाच्या पत्नीला तर नगरसेवकाच्या मुलाला एमआयडीसी, तांबेनगर येथील एका रहिवाशांला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावातील दोन मित्रांना आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत सावळ येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. या सर्वांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. हेही वाचा… देहविक्री करणारी तरुणी कोरोना पॉझिटिव्ह, 2 अधिकाऱ्यांसह तब्बल 1 डझन कॉन्स्टेबल क्वारंटाईन दोन दिवसांपूर्वी 32 वर्षीय अभियंत्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर त्याच्याच संपर्कात आलेल्या 28 वर्षीय भावाची तपासणी केली करण्यात आली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले. लोणावळा येथे पोलिस पदावर आपली ड्युटी बजावत असताना त्यांच्या सहकाऱ्याला कोरोनाचा संसर्गाची लागण झाली. त्यांना कळाल्यानंतर ते आपल्या मूळ गावी बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथे आले होते. त्यांनी तपासणी केली असता त्यांचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना मुक्त झालेल्या बारामतीत आता कोरोनाचा धोका वाढला असून आतापर्यंत कोरोना च्या संसर्गाने तीन व्यक्तींचा यात मृत्यू झाला आहे. तर बरे होऊन गेलेल्या रूग्णांची संख्या 20 आहे. बारामतीत आता कोरोना पॉझिटिव्ह 10 रुग्ण रूई येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. हेही वाचा… आईचा कोरोनामुळे मृत्यू; रुग्णालय प्रशासन मुलाला म्हणालं, पोतडीत घेवून जा मृतदेह दुसरीकडे, पुण्यात लॉकडाऊन हटवल्यानंतर महिन्याभरात Covid-19 रूग्णांची संख्या तिप्पट वाढली आहे. तसंच मृत्यूसंख्येतही दुप्पट वाढ झाली आहे. Active रूग्णसंख्याही 3 हजारांवरून थेट 6 हजारांच्यावर गेली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाचे स्थानिक नेतेही पुन्हा टोटल लॉकडाऊनची मागणी करू लागले आहेत. सजग नागरिक मंचाने मात्र लॉकडाऊनला कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यावरून राजकारणालाही आता सुरूवात झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.