पुणे, 11 सप्टेंबर: काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका भोंदूबाबानं वंशाचा दिवा मिळवण्यासाठी महिलेला नग्न करून तिच्या अंगाला अंगारा फासल्याची घटना उघडकीस आली होती. कुटुंबीयांच्या सहमतीनं हा धक्कादायक प्रकार घडला होता. ही घटना ताजी असताना अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी आणखी एक घटना पुण्यात (Pune) उडकीस आली आहे. विवाहित महिलेवर (Married woman) उपचार करण्याच्या बहाण्यानं पुण्यातील एका भोंदूबाबानं पीडितेसोबत लैंगिक चाळे (Sexual molestation by Bhondubaba) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांत जादूटोणाच्या कलमासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी भोंदूबाबासह फिर्यादीचा पती आणि सासरच्या अन्य मंडळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडितेनं तक्रारीत म्हटल्यानुसार, आरोपी पती मागील काही दिवसांपासून पीडित महिलेच्या इच्छेविरोधात अनैसर्गिक अत्याचार करत होता. त्यानंतर आरोपीनं पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिला वेडं ठरवण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर आरोपीनं पत्नीला वेडं ठरवून उपचारासाठी एका भोंदूबाबाकडे नेलं. हेही वाचा- जिच्यावर प्रेम केलं तिलाच रक्ताच्या थारोळ्यात पाडलं;थरारक घटनेनं चंद्रपूर हादरलं याठिकाणी भोंदूबाबानं उपचाराच्या नावाखाली विवाहित महिलेसोबत लैंगिक चाळे करून तिचा विनयभंग केला. संबंधित घृणास्पद प्रकार 14 एप्रिल ते 7 मे 2021 पर्यंत जवळपास तीन महिने सुरू होता. आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर 24 वर्षीय विवाहितेनं पोलिसांत फिर्याद केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भोंदूबाबासह पती आणि सासरच्या अन्य मंडळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. असीफ बाबा असं 70 वर्षीय आरोपी भोंदूबाबाचं नाव असून तो पुण्यातील येरवडा परिसरातील रहिवासी आहे. हेही वाचा- लग्नाला विरोध केल्यानं मुलीच्या आईसोबत अमानुष कृत्य, उसात आढळला मृतदेह पोलिसांनी आरोपी पतीविरोधात अनैसर्गिक अत्याचार तर सासरच्या मंडळीविरोधात कौटुंबीक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित सर्व आरोपी मागील काही महिन्यांपासून फिर्यादी महिलेला वेड ठरवून तिचा छळ करत होते. याप्रकरणी पोलीस सर्व आरोपींची कसून चौकशी करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.