राजगुरूनगर, 19 जून: एका मुख्याध्यापकानं दहावीच्या विद्यार्थिनीला (10th grade student)कार्यालयात बोलवून तिचा विनयभंग (Sexual Molestation) केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे बदनामीच्या भीतीनं पीडितेच्या घरचेही पोलिसांत तक्रार द्यायला धजावत आहेत. याप्रकरणी संस्थेच्या अध्यक्षांनी मुख्याध्यापकाविरोधात लेखी तक्रार दिली आहे. पण पोलिसांनीही या घटनेकडे कानाडोळा केल्याचं दिसत आहे. या घटनेला 20 दिवस उलटून गेले आहेत, तरीही आरोपी मुख्याध्यापकाविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित घटना पुणे (Pune) जिल्ह्याच्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पीडित मुलगी आठवीत शिकणाऱ्या आपल्या भावाची पुस्तकं परत द्यायला शाळेत गेली होती. दरम्यान शाळेत कोणीच नसल्याचं पाहून आरोपी मुख्याध्यापकानं पीडितेला आपल्या कार्यालयात बोलावलं. याठिकाणी आरोपी मुख्याध्यापकानं पीडितेशी लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या मुलीनं मुख्याध्यापकाच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली आणि घरी गेली. घरी गेल्यानंतर तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार पीडितेनं आपल्या पालकांना सांगितला.
हेही वाचा-संतापजनक! शेजाऱ्याचा 9 महिन्याच्या मुलीवर बलात्कार, रक्ताच्या थारोळ्यात आढळली
पण समाजात बदनामी होण्याच्या भीतीनं पीडितेच्या पालकांनी घटनेची वाच्यता कुठेही केली नाही. पण घटनेच्या दोन दिवसांनी शाळेत घडलेला संतापजनक प्रकार पालकांनी महिला शिक्षिकेच्या कानावर घातला. यानंतर शाळेत आणि गावात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना समोर आल्यानंतर आरोपी मुख्याध्यापकानं रजा टाकून शाळेत येणं बंद केलं आहे. तर या प्रकरणाची चौकशी व्हावी, यासाठी संस्थेच्या अध्यक्षांनी पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा-उसाच्या फडात नेत जबरदस्ती विवाह; 28वर्षीय तरुणानं पाचवीतील मुलीशी बांधली लग्नगाठ
ही घटना घडून 20 दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे. पण यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. तसेच अनेकांनी संबंधित मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pune, Sexual harassment