लखनऊ 19 जुलै: एक अत्यंत संतापजनक घटना नुकतीच समोर आली आहे. यात एका व्यक्तीनं नऊ महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार केला (Rape of 9 Month Old Baby) आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. आरोपी चिमुकलीला खेळण्यासाठी घेऊन जात असल्याचं सांगून आपल्या घरी घेऊन गेला. यानंतर त्यानं चिमुकलीवर बलात्कार केला. ही संतापजनक घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बुलंदशहरमधून (Bulandshahr) समोर आली आहे.
पोलिसांचं महिलेसोबत धक्कादायक कृत्य; Video पाहून देशभरातून व्यक्त होतोय संताप
टाइम्स नाऊमध्ये आलेल्या वृत्तानुसार, घटनेनंतर 9 महिन्यांच्या या चिमुकलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सांगितलं, की मुलीची प्रकृती गंभीर आहे. ही संतापजनक घटना बुलंदशहरमधील खुर्जा येथील आहे. आरोपी हा पीडितेचा शेजारीच होता. त्यानं चिमुकलीला आपल्या घऱी घेऊन जात हे संतापजनक कृत्य केलं. कुटुंबीयांनी जेव्हा चिमुकलीला पाहिलं तेव्हा ती रक्तात माखलेली होती.
आधी पोटच्या मुलांची हत्या; मग गळफास घेत महिलेची आत्महत्या, मन सुन्न करणारी घटना
या घटनेनंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी लगेचंच पाऊल उचलतं आरोपीच्या तीन नातेवाईकांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी सध्या सुरू आहे. पोलीस अधिकारी सुरेश कुमार यांनी सांगितलं, की आमची टीम सध्या घटनेचा तपास करत आहे. मुलीची मेडिकल तपासणी केली गेली आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल. त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.