परभणी, 19 जुलै: देशभरात शासन आणि प्रशासकीय पातळीवर बालविवाह (Child Marriage) रोखण्यासाठी अनेक अभियान चालवले जात. समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. पण प्रशासनाकडून केला जाणारा हा प्रयत्न अजूनही अपुराच ठरत आहे. परभणी जिल्ह्यात बालविवाहाची एक संताजनक घटना समोर आली आहे. येथील एका शेतात खुरपणी करणाऱ्या मायलेकीला गावातील काहीजणांनी बळजबरीने उसाच्या फडात (Sugarcane fields) नेत, 13 वर्षीय मुलीचा 28 वर्षाच्या तरुणासोबत बालविवाह (28 year old man married with 13 years) लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नवरदेवाच्या घरच्यांनी संबंधित लग्नाची मुलीच्या अन्य नातेवाईकांना खबरही लागू दिली नाही. पण या घटनेची माहिती मुलीच्या मामाला कळाल्यानंतर या घटनेला वाचा फुटली आहे.
संबंधित घटना परभणी (Parbhani) जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातील मंजरथ गावातील आहे. पीडित मुलीसह संबंधित तरुण हा याच गावातील रहिवासी आहे. पीडित मुलीचे आई-वडील शेतमजूर असून घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्याचबरोबर वडिलांना दारुचं व्यसन आहे. लग्न लावलेला 28 वर्षीय तरुणाचं नाव किशोर सुळ आहे. मागील बऱ्याच काळापासून किशोरचे नातेवाईक लग्नासाठी मुलीच्या कुटुंबीयांकडे आग्रह करत होते. पण मुलीचं वय कमी असल्यानं आईनं लग्नाला विरोध केला होता. पण नवऱ्याकडील मंडळींनी हार मानली नाही.
हेही वाचा-नात्याला काळिमा! शाळकरी मुलीवर चुलत भावांकडून बलात्कार; बीडमधील संतापजनक घटना
त्यांनी मुलीच्या वडिलांच्या दारुच्या व्यसनाचा फायदा घेतला. लग्नाअगोदर तरुणाच्या घरच्यांनी मुलीच्या वडिलांना सलग काही दिवस दारू पाजली आणि मुलीच्या लग्नासाठी होकार मिळवला. तसेच मुलीच्या आईला 50 हजार रुपये देण्याचं आमिषही दाखवलं. दरम्यान पीडित मुलगी आणि आई शेतात खुरपणी करत असताना, तरुणाकडील काहीजणांनी मायलेकीला उसाच्या फडात नेत. 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा 28 वर्षीय तरुणासोबत जबरदस्तीनं बालविवाह लावला आहे. गावातील अन्य नागरिकांना देखील या लग्नाबाबत माहिती होऊ दिली नाही.
हेही वाचा-आइसक्रीम देण्याच्या बहाण्यानं चिमुकलीला बोलावलं अन्...; 28 वर्षीय आरोपीला अटक
या घटनेची माहिती पीडित मुलीचे मामा गणेश थोरात यांना कळाल्यानंतर, त्यांनी या लग्नाचा विरोध केला आहे. या लग्नाला मामाचा आधीपासूनचं विरोध होता. दरम्यान मामा बाहेरगावी असताना, आरोपींनी संधीचा फायदा घेत बळजबरीनं हा विवाह लावल्याचा दावा मामानं केला आहे. त्याचबरोबर आताही मुलीला तरुणाच्या तावडीतून वाचवण्याची माझी तयारी असून या प्रकरणी तक्रार करणार असल्याचं मामानं सांगितलं आहे. याप्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Child marriage, Crime news, Parbhani