जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / वर्षभर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, घरातून 21 तोळे सोन्याचे दागिने चोरले!

वर्षभर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, घरातून 21 तोळे सोन्याचे दागिने चोरले!

वर्षभर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, घरातून 21 तोळे सोन्याचे दागिने चोरले!

मुलीच्या आजीला घरातील सोन्याचे दागिने दिसले नसल्याने संबंधित प्रकार उघडकीस आला.

  • -MIN READ
  • Last Updated :

  पुणे, 11 सप्टेंबर : मुंबईमध्ये आणि पुण्यात (pune) बलात्काराची घटना ताजी असताना पुण्यात आणखी एक अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण समोर आले आहे.  पुणे जिल्ह्यातील आळेफाटा (aalefata pune) येथे एका अल्पवयीन मुलीचा (Sexual abuse minor girl ) विश्वास संपादन करुन आर्थिक अडचणीचे कारण सांगत तिच्या घरातील तब्ब्ल 21 तोळे सोन्याच्या (gold) दागिन्यांवर डल्ला मारून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नराधमाला आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम देवराम डोंगरे ( वय-26, रा. चाळकवाडी, पिंपळवंडी, ता.जुन्नर) असं पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत  आळेफाटा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, 24 एप्रिल 2020 ते ऑगस्ट 2021 या कालावधीत आरोपी विक्रम डोंगरे याने अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी  बलात्कार केला. तसंच तिला विश्वासात घेत आर्थिक अडचण सांगून तिच्या आजीचे, आईचे व मावशीचे अंदाजे 8 लाख रुपये किंमतीचे तब्ब्ल 21 तोळे सोने लंपास केले. त्यानं अशी केली सोन्याची तस्करी; पण सापडलेच, पहा कुठे लपवलं होतं सोनं…! दरम्यान, मुलीच्या आजीला घरातील सोन्याचे दागिने दिसले नसल्याने संबंधित प्रकार उघडकीस आला. याबाबत शुक्रवारी ( 10 सप्टेंबर) पीडित मुलीने वरील प्रकार पोलिसांना सांगितला, त्यानुसार पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून आळेफाटा पोलिसांनी आरोपी विक्रम डोंगरे विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. बॉलिवूड रोजंदार कामगारांना यशराजकडून मदतीचा हात; असा करा अर्ज त्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने तात्काळ आरोपीला अटक केली असून त्याला कोर्टाने तीन दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एस. बडगुजर पुढील तपास करीत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: gold
  • First Published :
जाहिरात
जाहिरात