जाहिरात
मराठी बातम्या / देश / त्यानं शक्कल लढवून अशी केली सोन्याची तस्करी; पण सापडलाच..! पहा कुठं लपवलं होतं सोनं

त्यानं शक्कल लढवून अशी केली सोन्याची तस्करी; पण सापडलाच..! पहा कुठं लपवलं होतं सोनं

त्यानं शक्कल लढवून अशी केली सोन्याची तस्करी; पण सापडलाच..! पहा कुठं लपवलं होतं सोनं

तस्करांनी त्यांच्या हुशारीचा कस लावत सोन्याची साखळी आणि 951 ग्रॅम सोनं धूर्तपणे लपवून ठेवलं होतं. अशा तस्करांना पकडण्यात कस्टम अधिकारी अत्यंत तज्ज्ञ आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : सोन्याच्या तस्करीच्या अनेक घटना कानावर येत असतात. पोलिसांना चकवा देण्यासाठी तस्कर नवनवीन क्लृप्त्या शोधत राहतात. पण आमचे कस्टम अधिकारीही काही कमी नाहीत. सोनं तस्करीच्या (gold smugglers) ताज्या प्रकरणाबद्दल जाणून घेतल्यावर तुम्ही आधी तस्करांच्या आणि नंतर पोलिसांच्या अक्कलहुशारीला दाद द्याल. कारण तस्करानं शरीरातील अशा भागामध्ये सोनं लपवलं होतं की ते पकडणं इतकं सोपं नव्हतं. सोन्याच्या तस्करीप्रकरणी (gold smugglers) दिल्ली विमानतळावर दोघांना अटक करण्यात आली. तस्करांनी त्यांच्या हुशारीचा कस लावत सोन्याची साखळी आणि 951 ग्रॅम सोनं धूर्तपणे लपवून ठेवलं होतं. अशा तस्करांना पकडण्यात कस्टम अधिकारी अत्यंत तज्ज्ञ आहेत. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेत त्यांची तपासणी केली असता चक्क तोंडात दातांच्या मधील फटींमध्ये सोनं दडवलेलं सापडलं. तसंच दातांवरही सोन्याचा मुलामा चढवलेला आढळला. प्रकरण 28 ऑगस्टच्या रात्रीचं आहे. सोन्यासह इतर किमती वस्तूंच्या तस्करीबाबत विमानतळ पोलीस आणि कस्टम अधिकाऱ्यांना अत्यंत जागरूक रहावं लागतं. दिल्लीच्या विमानतळावर अशाच प्रकारे तस्करी करणाऱ्या हुशार तस्करी करणाऱ्या दोघांची त्याहीपेक्षा अधिक हुशार पोलिसांशी गाठ पडली. एएनआय या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार हे दोघे उझबेकिस्तानचे नागरिक आहेत. त्यांची कसून तपासणी केल्यानंतर त्यांच्या तोंडातून 951 ग्रॅम सोने आणि एक साखळी जप्त करण्यात आली. या दोघांना अटक केली आहे. हे वाचा -  धुवून वापरता येणारं कापडी डबल लेअर मास्क किती सुरक्षित? संशोधनातून समोर आल्या फायद्याच्या गोष्टी सोन्याच्या तस्करीची ही अनोखी पद्धत सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे. एएनआयच्या ट्विटवर लोक सतत मजेदार कमेंट करत आहेत. चला काही निवडक ट्विट्स बघूया.

जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात

या ट्विटवर आणखीन बऱ्याच हटके प्रतिक्रिया आल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात