Home /News /entertainment /

बॉलिवूड रोजंदार कामगारांना यशराजकडून मदतीचा हात; असा करा अर्ज

बॉलिवूड रोजंदार कामगारांना यशराजकडून मदतीचा हात; असा करा अर्ज

कोविड काळात यशराज फिल्म्सतर्फे कामगारांना, ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यासाठी ‘यश चोप्रा साथी इनिशिएटिव्ह’ (Yash Chopra Sathi Initiative) उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

मुंबई, 11सप्टेंबर-  कोरोना साथीचा (Corona Pandemic) मोठा फटका बॉलिवूड (Bollywood) अर्थात हिंदी चित्रपटसृष्टीलाही बसला आहे. अद्यापही बॉलिवूडमध्ये पूर्वीसारखं पूर्ण क्षमतेनं काम सुरू झालेलं नाही. त्यामुळे या क्षेत्रात रोजंदारीवर काम करणाऱ्या हजारो कामगारांची (Workers) अवस्था बिकट झाली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांच्या शाळेचा खर्च, औषधोपचार अशा अनेक खर्चांची तरतूद करणं कित्येक कामगारांना शक्य नाही. अशा कामगारांच्या मदतीला धावून आलं आहे यशराज फिल्म्स (Yash raj Films-YRF). यशराज फिल्म्सचे प्रमुख आदित्य चोप्रा (Aditya Chopra) यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत रोजंदारी करणाऱ्या कामगारांना आरोग्य विमा, शाळेची फी, रेशन खरेदी अशा अनेक सुविधा देणारं ‘साथी कार्ड’ (Sathi Card) सादर केलं आहे. कोविड-19 काळात कामगारांच्या मदतीसाठी यशराज फिल्म्स नेहमीच मदतीसाठी आघाडीवर राहिलं आहे. मदतीचा हात असाच कायम ठेवत यश चोप्रा फाउंडेशननं (Yash Chopra Foundation) जागतिक स्तरावरही प्रशंसनीय ठरलेल्या ‘युनिव्हर्सल बेसिक सपोर्ट’ (Universal Basic Support) संकल्पनेच्या आधारे हा ‘साथी कार्ड’चा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. (हे वाचा:चिमुकल्याच्या आजाराने अस्वस्थ झाले बिग बी; आयांशसाठी केलं गुप्तदान) मुंबईतील हिंदी फिल्म फेडरेशनकडे (Mumbai Hindi Film Federation) नोंदणी केलेली 35 वर्षं किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती, जिच्यावर कुटुंबातील एक सदस्य अवलंबून आहे, या योजनेसाठी अर्ज करू शकते. त्याकरिता त्या व्यक्तीला www.yashchoprafoundation.org या वेबसाइटवर अर्ज करावा लागेल. हे कार्ड असणाऱ्या व्यक्तीला 2 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा (Health Insurance), विनामूल्य वार्षिक आरोग्य तपासणी (Medical Check-UP), सवलतीच्या दरात औषधोपचार असे फायदे मिळतीलच, त्याशिवाय मुलांच्या शिक्षणासाठी (Children’s Education), रेशन (Ration) आणण्यासाठीही याचा वापर करता येईल. (हे वाचा:अरेच्चा! 'ही तर सोलापुरी चादर'; युजर्सने प्रियांकाच्या पतीला दिली अशी कमेंट) कोविड काळात यशराज फिल्म्सतर्फे कामगारांना, ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यासाठी ‘यश चोप्रा साथी इनिशिएटिव्ह’ (Yash Chopra Sathi Initiative) उपक्रम सुरू करण्यात आला असून, याद्वारे चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना 5 हजार रुपयांची मदत देण्यात येत आहे. 4 जणांच्या कुटुंबाला काही काळ पुरेल अशा रेशन किटचं वाटपही नियमितपणे करण्यात आलं. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या हजारो कामगारांचं लसीकरण करण्यासाठीही आदित्य चोप्रा यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे चित्रीकरण लवकर सुरू होण्यास मदत झाली. याबाबत माहिती देताना यशराज फिल्म्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष अक्षय विधानी (Akshay Vidhani) म्हणाले, की ‘यशराज फिल्म्समध्ये, आम्ही फक्त देणगी देण्याऐवजी कृती योजना राबवण्यावर विश्वास ठेवतो. साथी कार्डद्वारे आम्ही या चित्रपट उद्योगाचे आधारस्तंभ असलेल्या कामगारांना एक मित्र म्हणून, एक भक्कम आधार म्हणून मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. या लोकांचं आयुष्य चांगलं होण्यासाठी आम्ही यापुढेही काम करत राहू.’
First published:

Tags: Bollywood, Entertainment

पुढील बातम्या