मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

शाळेत केलेल्या कृत्याचा 16 वर्षांनी घेतला बदला; पुण्यातील तरुणाला भररस्त्यात मारहाण

शाळेत केलेल्या कृत्याचा 16 वर्षांनी घेतला बदला; पुण्यातील तरुणाला भररस्त्यात मारहाण

Crime in Pune: पुण्यातील एका तरुणाने शाळेत मारहाण केल्याचा बदला, तब्बल 16 वर्षांनी घेतला आहे. आरोपीनं फिर्यादी तरुणाला रस्त्यात गाठून बेदम मारहाण केली आहे.

Crime in Pune: पुण्यातील एका तरुणाने शाळेत मारहाण केल्याचा बदला, तब्बल 16 वर्षांनी घेतला आहे. आरोपीनं फिर्यादी तरुणाला रस्त्यात गाठून बेदम मारहाण केली आहे.

Crime in Pune: पुण्यातील एका तरुणाने शाळेत मारहाण केल्याचा बदला, तब्बल 16 वर्षांनी घेतला आहे. आरोपीनं फिर्यादी तरुणाला रस्त्यात गाठून बेदम मारहाण केली आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 27 ऑक्टोबर: शालेय शिक्षण घेतानाच्या अनेक गोड आठवणी आपल्या कायमच स्मरणात राहतात. पण शाळेत झालेला अपमान आणि खाल्लेला मारही विसरता येत नाही. अशा वाईट आठवणी आयुष्याचा एक भाग म्हणून अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. पण पुण्यातील एका तरुणाने मात्र शाळेत मारहाण केल्याचा बदला (beating in school), तब्बल 16 वर्षांनी घेतला (Take revenge after 16 years) आहे. आरोपीनं फिर्यादीला रस्त्यात गाठून आपण दोघंही एकाच शाळेत होतो. तू मला सारखा मारायचा असं म्हणत बेदम मारहाण केली आहे. पीडित तरुणाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

अमोल अंकुश कांबळे असं मारहाण झालेल्या 33 वर्षीय युवकाचं नाव असून तो पुण्यातील रहिवासी आहे. याप्रकरणी विकी शिरतर आणि त्याच्या अनोळखी मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विकीने आपल्या एका मित्राच्या मदतीने कांबळे याला जबरी मारहाण केली आहे. संबंधित धक्कादायक घटना औंध परिसरातील एम्स हॉस्पिटलसमोर घडली आहे.

हेही वाचा-MPSC परीक्षेत तोतयागिरी करणाऱ्या दोघांना अटक; 6 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा

पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, 24 ऑक्टोबर रोजी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी अमोल कांबळे आपल्या घरी जात होते. दरम्यान आरोपी विकी शिरतर आपल्या एका मित्राला घेऊन दुचाकीवरून त्याठिकाणी आला. याठिकाणी आल्यानंतर आरोपीनं 'मला ओळखलं का?' अशी विचारणा केली. यावेळी अमोल याने आपण दोघंही एकाच शाळेत आणि एकाच वर्गात शिकलो असल्याचं सांगितलं. ओळख पटल्यानंतर आरोपी विकीने 'शाळेत असताना तू मला खूप मारत होता, आता तुला मी सोडणार नाही' असं म्हणत शिवीगाळ करायला सुरुवात केली.

हेही वाचा-ठाणे: दहावीच्या 2 तुकड्या आपसात भिडल्या; भांडणात एकाची छातीत चाकू भोकसून हत्या

आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने लाथाबुक्क्यांनी अमोल याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर फिर्यादी कांबळे घरात गेले. यावेळी आरोपी शिरतर आणि त्याच्या मित्राने कांबळे यांच्या घरात शिरून त्याला बॅटने डोळ्यावर, पाठीवर आणि हातावर बेदम मारहाण करून जखमी केलं. याप्रकरणी जखमी अमोल कांबळे याने आरोपी विकी शिरतर आणि त्याच्या अनोळखी मित्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Pune