• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • ठाणे हादरलं! दहावीच्या दोन तुकड्या आपसात भिडल्या; भांडणात एकाची छातीत चाकू भोकसून निर्घृण हत्या

ठाणे हादरलं! दहावीच्या दोन तुकड्या आपसात भिडल्या; भांडणात एकाची छातीत चाकू भोकसून निर्घृण हत्या

Murder in Thane: ठाण्यातील एका शाळेत शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एका विद्यार्थ्याची निर्घृण हत्या (10th class student brutal murder) करण्यात आली आहे.

 • Share this:
  ठाणे, 27 ऑक्टोबर: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेली जवळपास पावणेदोन वर्षे शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर, अलीकडेच राज्यातील शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या होत्या. शाळा सुरू होताच ठाण्यातील (Thane) एका शाळेत रक्तरंजित घटना घडली आहे. येथील एका शाळेत शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एका विद्यार्थ्याची निर्घृण हत्या (10th class student brutal murder) करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन मारेकऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. अन्य एका आरोपीचा शोध सुरू आहे. तुषार साबळे असं हत्या झालेल्या 15 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो ठाण्यातील राजर्षी शाहू महाराज विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होता. मंगळवारी दुपारी त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या चार जणांनी तुषारची चाकू भोकसून (stabbed with knife) निर्घृण हत्या केली आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. हेही वाचा-11 कोटींचा विमा हडपण्यासाठी खुनी खेळ; कोब्राचा दंश घडवून निष्पापाचा घेतला बळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी दहावीची चाचणी परीक्षा होती. चाचणी परीक्षा असल्याने दहावीचे सर्व विद्यार्थी वर्गात हजर झाले होते. वर्ग भरल्यानंतर तुषार याच्यासह त्याच्या काही मित्रांनी वर्गातील काही जणांविरोधात आधीचा वाद उकरून काढला. सुरुवातीला बाचाबाची झाल्यानंतर वाद वाढत गेला. त्यामुळे हा वाद सोडवण्यासाठी मृत तुषार मध्यस्थी करायला गेला. पण तुषारने मारेकऱ्यांपैकी एकाच्या डोक्यात टपली मारल्याचा समज निर्माण झाला. हेही वाचा-चिमुकलीला पेरूच्या बागेत नेलं अन्..; 67 वर्षीय नराधमाच्या कृत्याने पुणे हादरलं! यामुळे दहावीत शिकणारे दोन गट आपसात भिडले. यातूनच दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या चार जणांनी तुषारच्या छातीत चाकू भोकसून त्याची निर्घृण हत्या केली आहे. आरोपी विद्यार्थ्यांनी केलेला हल्ला इतका भयंकर होता की, तुषार घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडला. ही थरारक घटना उघडकीस येताच तुषारला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी 15 वर्षीय तीन अल्पवयीन मारेकऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. अन्य एका आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: