इस्लामपूर, 26 ऑक्टोबर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तोतयागिरी (fraud in MPSC exams) करणाऱ्या दोघांना अखेर सांगली पोलिसांनी अटक (2 Arrested) केली आहे. संबंधित दोन्ही आरोपी गेल्या सहा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अखेर सापळा रचून मूळ परीक्षार्थ्यासह बोगस उमेदवाराला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने दोघांना 29 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत.
भास्कर माधव तास्के असं मूळ परीक्षार्थीचं नाव असून तो हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथील रहिवासी आहे. तर इंद्रजित बाळासाहेब माने हा तोतया उमेदवार असून तो वाळवा तालुक्यातील बहादूरवाडी येथील रहिवासी आहे. दोन्ही आरोपींना सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केलं आहे. राज्य लोकसेवा आयोगाचे उपसचिव सुनील हरिश्चंद्र औताडे यांनी दोन वर्षांपूर्वी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
हेही वाचा-मुंबई क्राइम ब्रांचची मोठी कारवाई; 24 किलो चरससह चौघे जेरबंद, 2 महिलांचा समावेश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य लोकसेवा आयोगाने मे 2015 मध्ये कर सहायक पदासाठी परीक्षा घेतली होती. या परीक्षेत मूळ विद्यार्थी भास्कर तास्के याच्या नावावर इंद्रजित माने याने परीक्षा दिली होती. आरोपी माने याने आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीवर बनावट खातं काढून राज्य लोकसेवा आयोगाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांचा हा बनाव फार काळ टिकला नाही.
हेही वाचा-जालना: डॉक्टरच्या बनावट सहीने घेतलं 328कोटींचं कर्ज; त्या प्रकरणात ED ची एन्ट्री
संबंधित प्रकरण उघडकीस आल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. राज्य लोकसेवा आयोगाचे उपसचिव सुनील हरिश्चंद्र औताडे यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर, अखेर पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. दोन्ही आरोपींना न्यायालयाने 29 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Mpsc examination