Home /News /pune /

स्कॉलरशिप घोटाळा, काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांच्या संस्था EDच्या रडावर

स्कॉलरशिप घोटाळा, काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांच्या संस्था EDच्या रडावर

संबंधित कॉलेजेसना समाजकल्याण खात्यामार्फत शिष्यवृत्तीची रक्कम वर्ग होऊनही विद्यार्थ्यांना ती मिळत नव्हती. त्यामुळे त्याची SIT मार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले होते.

पुणे 26 जानेवारी : शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी समाज कल्याण खात्यामार्फत पुणे जिल्ह्यातील शिक्षण संस्थाना पाठवण्यात आलेल्या ईडी नोटीसीला तब्बल 780 कॉलेजेसने केराची टोपली दाखवलीय. फडणवीस सरकारने ईडी मार्फत या शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील 1609 शिक्षणसंस्थाना शिष्यवृती वाटपाचा हिशेब सादर करण्याचे निर्देश दिले होते. पण त्याची मुदत उलटूनही गेली. मात्र पुणे जिल्ह्यातील 780 शिक्षण संस्थानी अद्यापही समाजकल्याण खात्याला शिष्यवृत्ती वाटपाचा हिशेबच सादर केलेला नाही. राज्याच्या समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दरवर्षी कोट्यवधी रुपयांची शिष्यवृत्ती वाटली जाते. पण 2010 ते 2017 या कालावधीत याच मागासवर्गीय शिष्यवृत्ती वाटपात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप सातत्यानं होतोय. संबंधित कॉलेजना समाजकल्याण खात्यामार्फत शिष्यवृत्तीची रक्कम वर्ग होऊनही विद्यार्थ्यांना ती मिळत नव्हती. त्यामुळे तत्कालीन फडणवीस सरकारनं शिष्यवृत्ती घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी स्वतंत्र एसआयटीची स्थापना केली. चौकशीदरम्यान शिष्यवृत्ती वाटपात प्रचंड अनियमितता आढळून आल्यानंतर हे प्रकरण ईडीकडे सोपवलं गेलं. त्यानंतर ईडीनं समाजकल्याण खात्यामार्फत पुणे जिल्ह्यातील सर्व म्हणजेच 1609 शिक्षणसंस्थांना शिष्यवृत्ती वाटपाचं हिशेब सादर करण्याचे आदेश दिले. ठाकरे सरकारला मिळेना वाघ, मुख्यमंत्र्यांनी केली रिकाम्या पिंजऱ्याची पाहणी या ईडीच्या नोटीसीला उत्तर देण्याची मुदत संपूनही तब्बल 780 शिक्षणसंस्थांनी शिष्यवृत्ती वाटपाचे हिशेबच सादर केलेले नाहीत. शिष्यवृत्ती घोटाळ्याबाबत पुणे जिल्हा समाजकल्याण खात्याकडे चौकशी केली असता त्यांनी ही बाब मान्य केली. पण कारवाईबाबत विचारताच त्यांनी ईडी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बोट दाखवलं. ईडीच्या नोटीशीला केराची टोपली दाखवणाऱ्या 780 कॉलेजेसमध्ये पुण्यातील अनेक नामांकित शिक्षणसंस्थांचा समावेश आहे. CAA 'शाहीन बाग'ने आणला मोदी सरकारच्या नाकात दम, महिलांचा एल्गार या आहेत शिक्षणसंस्था भारती विद्यापीठ, सिंहगड शिक्षणसंस्था, मराठवाडा मित्रमंडळ, डीवाय पाटील कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, मॉर्डन कॉलेज, गरवारे कॉलेज, सिम्बॉयसिस, पुना कॉलेज, डेक्कन शिक्षण संस्था आणि एसएनडीटी कॉलेज.

निर्भया प्रकरण : दोषी विनयने तुरुंगात केलेल्या 11 पेंटिंग्सची विक्री

या नामांकित कॉलेजेससोबतच काँग्रेस - राष्ट्रवादी नेत्यांच्याही अनेक शिक्षण संस्था शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्यावर शिष्यवृत्तीची रक्कम परस्पर इतरत्र वळवल्याचा गंभीर आरोप आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर स्थापन झालेलं ठाकरे सरकार मागासवर्गीय शिष्यवृत्ती घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Fraud, Scholarship

पुढील बातम्या