ठाकरे सरकारला मिळेना वाघ, मुख्यमंत्र्यांनी केली रिकाम्या पिंजऱ्याची पाहणी

ठाकरे सरकारला मिळेना वाघ, मुख्यमंत्र्यांनी केली रिकाम्या पिंजऱ्याची पाहणी

दुसरं महत्त्वाचे म्हणजे दालनात प्राणी नसताना त्याची पाहणी करण्याची घाई का केली असाही प्रश्न उपस्थित होतोय.

  • Share this:

मुंबई 26 जानेवारी : राणीच्या बागेत सुरू करण्यात आलेल्या सहा दालनांपैकी सर्वात सुंदर असं  दालन भारताचा राष्ट्रीय प्राणी  म्हणजेच वाघासाठी तयार करण्यात आलं आहे. पण या दालनात अजून वाघ मात्र आलेले नाहीत. तरीही मुख्यमंत्र्यांनी मात्र या दालनाची पाहणी केली. आता खरंतर या दालनात प्राणी नसताना त्याची पाहणी करण्यात काय अर्थ आहे असा प्रश्न कोणालाही पडेल. पण कामाचा सपाटा दाखवण्याच्या नादात हा प्रकार घडला आहे. खरेतर या दालनात वाघ आणण्याची तयारी वीर जिजामाता उद्यानात तर्फे करण्यात आली होती. पण सेंट्रल झू अथॉरिटीने प्रस्ताव मान्य न केल्यामुळे हे दालन रिकामं राहीलं आणि मुख्यमंत्र्यांना रिकाम्याच दालनाची पाहणी करावी लागली. उद्घाटन करण्यात आलेल्या इतर पाच प्रत्येकी अस्वल, कोल्हा, तरस, बिबट्या आणि पक्षांचा समावेश आहे.

परंतु शिवसेनेचा आवडता प्राणी ज्याचं बिरुद शिवसेना आपल्या प्रत्येक नेत्यासाठी वापरते तो वाघच शिवसेनेला मिळत नाहीये‌. खरंतर वाघाची देवाण-घेवाण करण्याचा प्रस्ताव जिजामाता उद्यान आणि औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालय याबरोबर मान्य झाला आहे. औरंगाबाद प्राणिसंग्रहालय हे जिजामाता उद्यानाला वाघांची एक जोडी देणार आहे. तर जिजामाता उद्यान त्या बदल्यात काही पक्षी औरंगाबाद प्राणीसंग्रहालयाला देणार आहे. आता केवळ सेंट्रल झू अथोरिटीची परवानगी त्यासाठी आवश्यक आहे. परंतु महिना होऊनही परवानगी मिळालेली नाही.

सावधान! तुमच्या जीवाशी खेळ केला जातोय, हे PHOTO पाहून तुमचाही संताप अनावर होईल

त्यामुळे वाघांचं आगमन जिजामाता उद्यानात होऊ शकलेलं नाही. आता सर्वसाधारणपणे पंधरा ते वीस दिवसात मिळणारी परवानगी अजून काल मिळाली नाही, की यातही काही राजकारण आहे हे बघावं लागेल. पण राजकीय वर्तुळात संशय मात्र तोच व्यक्त होतोय. दुसरं महत्त्वाचे म्हणजे दालनात प्राणी नसताना त्याच्या पाहणीची घाई का केली असाही प्रश्न उपस्थित होतोय.

त्यातच या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत राज्यातील महाविकास आघाडीचा भाग असलेले आणि शहर परिसराचे पालकमंत्री या नात्याने असलम शेख यांचे एकट्याचेच नाव होते परंतु पालिकेतील इतर कुठल्याही पक्षाचे अथवा विरोधकांचे नाव नव्हते. त्यामुळे त्यांनीही या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आणि नाराजी व्यक्त केली.

 

 

First published: January 26, 2020, 3:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading