नवी दिल्ली, 26 जानेवारी : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींना 1 फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात येणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत चारही दोषींकडून फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोषींचे वकील ए.पी.सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार चारपैकी एक दोषी विनयने तुरुंगात तब्बल 11 पेंटिग्स तयार केल्या आहेत. या पेंटिंग्सची तिहार हाटमध्ये विक्रीदेखील करण्यात आली आहे. मात्र तिहार तुरुंग प्रशासनाकडून विक्री केलेल्या पेंटिंग्सबाबत काहीही सांगण्यात आलेले नाहीये.
विनयची पेंटिंग
दोषींच्या वकिलाने सांगितल्यानुसार, विनयने तुरुंगात पेंटिग तयार केली आहे. तिहार हाटमध्ये त्यांच्या पेंटिंग्सची विक्रीही झाली आहे. ती पेंटिग कितीला विकली गेली याची माहिती वकीलाने तुरुंग प्रशासनाकडून मागितली आहे. विनयने 11 पेंटिग्स केल्या असून 19 पानांची दरिंदा शीर्षकाअंतर्गत डायरी लिहिली आहे.
दोषींची बाजू लढणारे वकील ए.पी.सिंह यांनी सांगितल्यानुसार दोषींच्या काही वस्तू या काल रात्री 10.30 पर्यंत देण्यात आल्या आहेत. मात्र दोषी विनय शर्माची डायरी अद्याप देण्यात आलेली नाही. वकीलांच्या म्हणण्यानुसार ही डायरी 160 पानी असून त्याचा मेडिकल रिपोर्टही अद्याप देण्यात आलेला नाही. विनय़ याची तब्येत बरी नसून त्याला तुरुंगात विष (Slow Poison) दिल्याचा आरोप दोषींच्या वकीलाने केला आहे. विनयचा हात फ्रॅक्चर झाला असून तो गेल्या सात दिवसांपासून उपोषण करीत आहे. यासंदर्भात मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर नेमकं स्पष्ट होईल.
अन्य बातम्या
Paytm वापरताय? या क्रमांकांपासून सावध रहा अन्यथा खातं होईल रिकामी
कोरोना व्हायरसचा भारतात धोका वाढला, संशयितांची संख्या 100वर; PMO कडून अलर्ट
नागरिकांनो सजग रहा, प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याला अतिदक्षतेचा इशारा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi, Nirbhaya gang rape case, Tihar jail