Home /News /pune /

Sambhaji Raje: संभाजीराजे पत्रकार परिषदेत काय करणार घोषणा? मोठी अपडेट आली समोर

Sambhaji Raje: संभाजीराजे पत्रकार परिषदेत काय करणार घोषणा? मोठी अपडेट आली समोर

संभाजीराजे पत्रकार परिषदेत काय करणार घोषणा? मोठी अपडेट आली समोर

संभाजीराजे पत्रकार परिषदेत काय करणार घोषणा? मोठी अपडेट आली समोर

Sambhaji Raje PC in Pune: संभाजीराजे यांची पुण्यात पत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेत संभाजीराजे काय घोषणा करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

पुणे, 12 मे : संभाजीराजे (Sambhaji Raje) यांच्या राज्यसभेच्या खासदारकीचा कार्यकाळ संपला आहे. खासदारकीची मुदत संपल्यावर संभाजीराजे आपल्या राजकीय वाटचालीच्या संदर्भात आज घोषणा करणार आहेत. दुपारी 12 वाजता पुण्यात संभाजीराजे पत्रकार परिषद (Sambhaji Raje Press conference in Pune) घेत आपली पुढील दिशा स्पष्ट करणार आहेत. मात्र, त्यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीराजे छत्रपती सक्रिय राजकारण करणार आहेत. केंद्रीय पक्ष असलेल्या भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची चाचपणी केल्यानंतर मर्यादा लक्षात घेत स्वतंत्र भूमिका घेऊन एकला चलो रे चा नारा देणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. संभाजी छत्रपती हे नव्या राजकीय संघटनेची किंवा पक्षाची तयारी सुरू करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत घोषित करण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाचा : 'नवनीत राणा या सी ग्रेड स्टटंबाज', शिवसेनेचं जशास तसं उत्तर दोन दिवसांपूर्वी फडणवीसांची घेतली भेट मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे भाजपचे राज्यसभेचे खासदार संभाजीराजे आता लवकरच नवीन राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याची चर्चा आहे. 10 मे रोजी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची संभाजीराजेंनी भेट घेतली होती. आता 12 मे रोजी पुण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून संभाजीराजे मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे म्हणाले की, 'माझी भूमिका 12 मे रोजी स्पष्ट करणार आहे. या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नाही, असे नाही पण काही जे बोलायचे आहे ते मी 12 मे ला बोलणार आहे', अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली होती. पुण्यात आज मेळावा जाहीर करण्यात आला आहे. या मेळाव्यात संभाजीराजे आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे पोस्टर व्हायरल झाले आहे. या पोस्टरवर 'महाराष्ट्राच्या भल्यासाठी...नवी दिशा, नवा विचार आणि नवा पर्याय...' असा मजकूर लिहिला आहे. त्यामुळे संभाजीराजे हे भाजपकडून पुन्हा खासदार होऊन जाणार ही शक्यता आता मावळत चालली आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: BJP, Maharashtra News, Pune, Sambhajiraje chhatrapati

पुढील बातम्या