मुंबई, 11 मे : खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि शिवसेना (shivsena) हा वाद अजूनही सुरूच आहे. दिल्लीत भाजप नेत्यांच्या भेटीनंतर राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जळजळीत टीका केली होती. तर, नवनीत राणा या सी ग्रेड पब्लिसिटी स्टंटबाजी करतात’ असा सणसणीत टोला शिवसेनेच्या नेत्या आणि महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी लगावला. दिल्लीत भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर राणा दाम्पत्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्यांच्या टीकेला उत्तर देताना किशोरी पेडणेकर यांनी जोरदार पलटवार केला. नवनीत राणा या सी ग्रेड पब्लिसिटी स्टंटबाजी करतात. संविधानिक पदावर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्या बोलतात. त्यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका पेडणेकर यांनी केली. ( 90 हून अधिक कोब्रा पाहून बोबडी वळली, घरातच जुन्या भांड्यात आढळले विषारी साप ) ‘त्यांनी त्यांचे प्रायव्हेट क्षण व्हायरल करताना काही वाटलं नाही, स्पॅान्डलायसिससाठी स्कॅन करता, हे भाजपने सोडलेले पिल्लु आहे, ते जाणून बुजून अशी स्टंटबाजी करत आहे, अशी टीकाही पेडणेकर यांनी केली. मर्दानी शब्द हा नवनीत राणांच्या तोंडात शोबत नाही. तुम्ही वाह्यात आहात. सी ग्रेड पब्लिसिटी करायला तुम्हाला लोक सांगतात ते तसं करतात. नवनीत राणा या स्पॅाडिलॅसिसच्या रूग्ण नाही तर मनोरुग्ण आहे, कितीही खालच्या भाषेत बोललं तरी उद्धवजींच्या इमेज वर परिणाम होणार नाही, अशी टीकाही पेडणेकर यांनी केली. ( ‘हा’अभिनेता आहे साऊथ स्टार महेश बाबूचा भावोजी,श्रद्धा कपूरसोबत केलंय काम ) ‘लीलावती रुग्णालयात एमआरआय स्कॅनमध्ये मोबाईल नेण्यास मनाई आहे. असं असतानाही मॅगनेट मेटल शस्त्र कसं नेलं. प्रायव्हेट रूममध्ये लव्हसिनला आमचा आक्षेप नाही. पण, एमआरआय चाचणी सुरू असताना मोबाईल नेणे हे धोकादायक आणि नियमांचे उल्लंघन करणारे आहे. ‘नायर रुग्णालयात मोबाईलामुळे एक मुलगा मशिनमध्ये खेचला गेला होता. म्हणून नोटीस बजावण्यात आली’ असं किशोर पेडणेकर म्हणाल्या. काय म्हणालं होतं राणा दाम्पत्य? “बाळासाहेबांनी हिंदुत्व मजबूत करण्यासाठी काम केलं. तुम्ही इंग्रजांच्या कायदाचा वापर करुन जी लोकं धर्माचा प्रचार करतात, रामाचं नामस्मरण करतात त्या निष्पक्ष लोकांना जेलमध्ये टाकण्याचं काम करत आहात. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, असं बाळासाहेबांची इच्छा होती. पण तुम्ही सत्तेच्या लोभापाई भाजपच्या पाठीवर खंजीर खुपसला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेऊन तुम्ही मतं मागितले. तुमचे लोकसभेत खासदार आणि विधानसभेत आमदार आले. तुम्ही मोदींच्या नावाने मतं जमा केले. पण जेव्हा भाजप नेते देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची वेळ आली तेव्हा तुम्ही सत्ता स्थापनेच्या ऐनवेळी भाजपला धोका दिला. तुम्ही पळ काढून आघाडीसोबत गेले आणि मुख्यमंत्री बनले. त्याच दिवशी तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची हत्या केली”, असा घणाघात रवी राणांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.