मुंबई, 25 डिसेंबर : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर विरोधकांकडून गंभीर आरोप करण्यात आले होते. या आरोपानंतर आता राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली आहे. माझ्यावर ज्या महिलेने आरोप केले, त्या महिलेसोबत माझं कोणतंही रिलेशनशिप नव्हतं असं शेवाळे यांनी म्हटलं आहे. तसेच ज्या महिलेने आरोप केले त्या महिलेचं कुटुंब गुन्हेगारी पार्श्वभूमीचं असल्याचा आरोपही राहुल शेवाळे यांनी केल आहे. ही महिला जेव्हा दुबईत अडकली होती, तेव्हा मी या महिलेला मदत केली, त्यानंतर तिची अपेक्षा वाढत गेली. आज ही महिला खोटे फोटो दाखवून माझ्यावर आरोप करत असल्याचा दावा शेवाळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप दरम्यान यावेळी राहुल शेवाळे यांनी ठाकरे गट आणि राष्ट्रवादीवर देखील गंभीर आरोप केले आहेत. या महिलेनं फेक अकाउंट तायर करून बनावट व्हिडीओ तयार केले. माझ्या पत्नीला देखील या महिलेने धमक्या दिल्या. या महिलेचं पाकिस्तानशी कनेक्शन असून, पाकिस्तानी एजंटमार्फत हे सर्व सुरू आहे. संबंधित महिलेला दुबईमध्ये 86 दिवस अटक झाली होती. मात्र पुन्हा एप्रिलपासून ही महिला सक्रिय झाली. युवासेनेचे अनेक पदाधिकारी या महीलेच्या संपर्कात होते, सदर महीला दाऊदसोबत आहे. त्या महीलेचे दाऊद गॅंगशी संबंध आहेत. हे मोठं प्रकरण आहे. मात्र या प्रकरणाला आदित्य ठाकरे पाठिशी घालत असल्याचा आरोप खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. हेही वाचा : ..‘त्या दिवशी संजय राऊत शरद पवारांच्या मांडीवर बसलेले दिसतील’; शिदे गटाचा पुन्हा हल्लाबोल चौकशीची मागणी दरम्यान राहुल शेवाळे यांनी राष्ट्रवादीवर देखील गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रवादीचे संबंध दाऊद गॅंगसोबत आहेत. ते या महिलेच्या पाठिशी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मला अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. शिवसेना सोडल्यामुळे माझी बदनामी सुरू आहे. गेले वर्षभर मी गप्प होतो. मात्र आता या प्रकरणाची चौकशी एनआयएमार्फत करण्यात यावी, अशी माझी मागणी असल्याचं राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.