पुणे, 18 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती येथील ॲग्रो कारखान्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साखर कारखान्यांबाबत सरकारने गाळप हंगाम सुरू करण्याबाबत तारीख निश्चित करण्यात आली होती. परंतु रोहित पवार यांच्या साखर कारखान्याने तारखे आधीच गाळप हंगाम सुरू केल्याने कारखान्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मंत्री समितीच्या निर्णयाचे उल्लंघन करून गाळप केल्याने बारामती ॲग्रोचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर कलम 188अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बारामती ॲग्रोचे सर्वेसर्वा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
कोण आहेत अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी? ज्यांनी थेट अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केला
इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथील बारामती ॲग्रो साखर कारखान्याने 15 ऑक्टोबर 2022 पूर्वी गाळप हंगाम सुरू केल्याचा दावा भाजप नेते, विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी केला होता. यानंतर साखर आयुक्तालयांतर्गत विशेष लेखापरीक्षक यांच्यामार्फत या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश देण्यात आले.
मात्र, त्यांच्या अहवालात विसंगती आढळल्याने लेखापरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणाच्या चौकशीनंतर दि. 8 मार्च 2023 रोजी भिगवण पोलिसांत बारामती ॲग्रोचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल जयसिंघानी 'मविआ'तील सर्व पक्ष फिरला; त्यामुळे आता.., मुख्यमंत्री शिंदेंनी दिला इशारा
शासनाच्या मंत्री समितीच्या निर्णयानुसार 15 ऑक्टोबरनंतर ऊस गाळप हंगाम सुरू करावयाचा होता; मात्र बारामती ॲग्रोने 10 ऑक्टोबर 2022 रोजी हंगाम सुरू केला, अशी तक्रार दाखल झाल्यानंतर अप्पर निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य यांनी दि. 7 डिसेंबर 2022 मध्ये चौकशी अहवाल सादर केला. त्यामध्ये बारामती ॲग्रो या साखर कारखान्याने मंत्री समितीच्या निर्णयाचे व साखर आयुक्त कार्यालयाच्या परिपत्रकाचे उल्लंघन केल्याचा ठपका गुळवे यांच्यावर ठेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Baramati, Rohit pawar, Sugar facrtory, Sugarcane