मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोण आहेत अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी? ज्यांनी थेट अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केला

कोण आहेत अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी? ज्यांनी थेट अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केला

डिझायनर अनिक्षा जयसिंघानीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपये लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

डिझायनर अनिक्षा जयसिंघानीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपये लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

डिझायनर अनिक्षा जयसिंघानीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपये लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 17 मार्च : डिझायनर अनिक्षा जयसिंघानीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपये लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तिला अटक करण्यात आली आहे. आपल्या वडिलांना एका चुकीच्या गुन्हेगारी प्रकरणात अडकवण्यात आलं आहे, त्यांना त्या प्रकरणातून सोडवण्याची मागणी अनिक्षा जयसिंघानीने अमृता फडणवीस यांच्याकडे केली होती. एवढंच नाही तर अमृता यांना धमकी देखील देण्यात आली होती. या प्रकरणात वीस फेब्रुवारी रोजी अमृता फडणवीस यांनी अनिक्षा आणि तिचे वडील अनिल जयसिंघानीविरोधात मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. अमृता फडणवीस यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गुरुवारी या प्रकरणात अनिक्षाला चौकशीसाठी डीबी मार्ग पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं होतं, चौकशीनंतर तिला अटक करण्यात आली. अनिक्षा आणि तिच्या वडिलांवर मुंबई पोलिसांनी भादवीच्या 120 ब अतंर्गत गुन्हा दाखल केला आहे.

कोण आहे अनिक्षा जयसिंघानी?

अनिक्षा जयसिंघानी बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी आहे. या प्रकरणात खुलासा करताना देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले की, अनिल जयसिंघानी यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. मलबार हिल पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आपण एक डिझायनर असून, कपडे, चपला आणि दागिने जिझाईन करत असल्याचा दावा अनिक्षाने केला आहे. अनिक्षा जयसिंघानीने अमृता फडणवीस यांना तिने डिझायीन केलेले कपडे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये घालण्याची विनंती केली होती. ज्यामुळे तिच्या उत्पादनाचा प्रचार होऊ शकेल.

अनिक्षाला अटक

देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की अनिक्षा आणि अमृता फडणवीस यांची पहिली भेट 2015-16 मध्ये झाली होती. त्यानंतर 2021 मध्ये त्यांची पुन्हा भेट झाली. अनिक्षा गेल्या सोळा महिन्यांपासून अमृता यांच्या संपर्कात होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा अनिक्षाने अमृता फडणवीस यांचा विश्वास संपादन केला तेव्हा तिने अमृता फडणवीस यांना काही बुकींबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपल्या वडिलांची सुटका करण्यासाठी अमृता फडणवीस यांना थेट एक कोटींची लाच देण्याचा प्रयत्न तिने केला. या प्रकारानंतर अमृता फडणवीस यांनी अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानीविरोधात तक्रार दाखल केली. अमृता फडणवीस यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिला अटक करण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: Devendra Fadnavis