मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

'ऑक्सिजन टँकर पाठवलाय; अजित पवारांचा एक फोन आणि अर्ध्या रात्री रुग्णांच्या मदतीला पोहोचले रोहित पाटील

'ऑक्सिजन टँकर पाठवलाय; अजित पवारांचा एक फोन आणि अर्ध्या रात्री रुग्णांच्या मदतीला पोहोचले रोहित पाटील

अजित पवारांच्या (Ajit Pawar) केवळ एका फोननंतर  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील  (Rohit Patil) रुग्णांच्या मदतीसाठी धावून गेले. पवारांच्या फोननंतर क्षणाचाही विलंब न करता रोहित पाटील यांनी मध्यरात्री सांगलीत जाऊन ऑक्सिजन टँकर उतरून घेतला.

पुढे वाचा ...

सांगली 02 मे : देशात कोरोनाचा (Coronavirus in India) प्रसार अतिशय झपाट्यानं होत आहे. त्यातही महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. अशात रुग्णांना उपचारासाठी रांगेत उभा राहून वाट पाहावी लागत आहे. ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा (Shortage of Oxygen) असल्यानं अनेक रुग्णांना प्राणही गमवावा लागत आहे. मात्र, अशा परिस्थितीमध्येही उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) केवळ एका फोननंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील (Rohit Patil) रुग्णांच्या मदतीसाठी धावून गेले.

रात्री साडेबारा वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पाटील यांना फोन केला. 'रोहित, ऑक्सिजन टँकर पाठवला आहे. तू स्वतः थांबून तो उतरून घे', असं अजित पवारांनी सांगितलं. पवारांच्या फोननंतर क्षणाचाही विलंब न करता रोहित पाटील यांनी मध्यरात्री सांगलीत जाऊन ऑक्सिजन टँकर उतरून घेतला. त्यांनतर यातील 23 जंबो टाक्या व 2 डुरा टाक्या ऑक्सिजन घेऊन रोहित पाटील स्वतः ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरा उपस्थित झाले. ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्ण दगावू नयेत, याची काळजी घेत मध्यरात्री रुग्ण वाचवण्यासाठी आबांच्या मुलाने केलेली ही धडपड नक्कीच कौतुकास्पद आहे.

तासगाव तालुक्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज शंभरहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा होत आहे. तासगाव शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. शहरातील ग्रामीण रुग्णालय तसेच अन्य खासगी ठिकाणी कोरोना हॉस्पिटल सुरू करण्यात आली आहेत. मात्र रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने गरजूंना ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध करून देताना प्रशासनाची दमछाक होत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांचीही जिल्हाभर बेड शोधताना फरफट होत आहे.

गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने आमदार सुमन पाटील, रोहित पाटील यांच्या प्रयत्नातून येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी 56 ऑक्सिजनेटेड बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे याठिकाणी सध्या अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र एकूणच राज्यभरात रुग्णसंख्या वाढ वेगाने होत असल्याने ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासत आहे. तासगावतही कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कमी पडत आहे.

या स्थितीनंतर तासगावातील रुग्णांसाठी ऑक्सिजन टँकर उपलब्ध करून घ्यावा, अशी मागणी रोहित पाटील यांनी राज्य सरकारकडे केली होती. या मागणीचा ते सतत पाठपुरावा करीत होते. तासगावातील गंभीर स्थिती ते सरकारच्या निदर्शनास आणून देत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांनी ऑक्सिजन टँकरची मागणी लावून धरली होती. अखेर काल मध्यरात्री अजित पवारांनी रोहित पाटील यांना फोन केला. पवारांच्या सुचनेनंतर रोहित पाटील स्वतः मध्यरात्री घरातून बाहेर पडले. भारत गॅसच्या विवरण केंद्रावर रात्री उशिरापर्यंत थांबून त्यांनी ऑक्सिजनचा टँकर उतरून घेतला.

First published:

Tags: Ajit pawar, Oxygen supply, R r patil blog, Sangli