भयंकर! मुलगी प्रियकराच्या मिठीत दिसली; चिडलेल्या जन्मदात्यांनीच दोघांना जिवंत जाळलं

भयंकर! मुलगी प्रियकराच्या मिठीत दिसली; चिडलेल्या जन्मदात्यांनीच दोघांना जिवंत जाळलं

प्रेम केलं म्हणून आपल्या पोटच्या पोरीला तिच्या प्रियकराबरोबर कोंडून जिवंत जाळण्याचा भयंकर प्रकार उघडकीला आला आहे.

  • Share this:

बांदा (उत्तर प्रदेश), 6 ऑगस्ट : प्रेम केलं म्हणून आपल्या पोटच्या पोरीला जिवंत जाळण्याचा प्रकार घडला आहे.  19 वर्षांच्या मुलीला तिच्या पालकांनी प्रियकराबरोबर पाहिलं. त्यामुळे चिडलेल्या घरच्यांनी त्या दोघांना एका झोपडी कोंडलं आणि सरळ आग लावून दिली. यामध्ये तिचा 23 वर्षांचा प्रियकर भोला याचे प्राण गेले आहेत. तर मुलगी 80 टक्के भाजली असून अत्यवस्थ अवस्थेत तिला कानपूरच्या मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आलं.

हा क्रूर प्रकार उत्तर प्रदेशातल्या बांदा गावात घडला. प्रियांका नावाच्या या 19 वर्षांच्या मुलीचं गावातल्या एका तरुणावर प्रेम होतं. तिच्या घरच्यांना ते मान्य नव्हतं. तरीही हे दोघे भेटत असत.

प्रियांकाच्या आई-वडिलांनी भोलाच्या बाहुपाशात पाहिलं. नको त्या अवस्थेत मुलीला पाहून चिडलेल्या आईवडिलांनी त्या दोघांना एका झोपडीत कोंडलं आणि आग लावून दिली, असा आरोप आहे.

बुधवारी हा प्रकार उघडकीस आला. भोलाला स्थानिक रुग्णालयात दाखल करत असतानाच मृत घोषित करण्यात आलं. 80 टक्के भाजलेल्या प्रिकांकाला कानपूरच्या मोठ्या रुग्णालयात हलवत असताना तिने प्राण सोडला.

मुलीच्या घरातल्या 9 नातेवाईकांविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यापैकी तिघांना अटकही करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेंद्र प्रताप सिंह यांनी दिली. या प्रकरणी ते अधिक तपास करत आहेत.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: August 6, 2020, 7:11 PM IST

ताज्या बातम्या