Home /News /crime /

दिल्ली पुन्हा हादरली! 13 वर्षीय मुलीवर तिच्याच घरात बलात्कार करून भोसकली कात्री

दिल्ली पुन्हा हादरली! 13 वर्षीय मुलीवर तिच्याच घरात बलात्कार करून भोसकली कात्री

पीडित मुलीचं कुटुंब हे मूळचं बिहारचं आहे. कामानिमित्त ते दिल्लीत स्थलांतरीत झाले आहे.

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट: दिल्लीतील पीरागढी परिसरात एका 13 वर्षीय मुलीवर तिच्या घरात सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगी घरात एकटीच होती. त्यावेळी नराधमांनी डाव साधून घरात घुसून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. मुलीने प्रतिकार केला असता नराधमांनी तिच्या पोटात कात्री भोसकली. हेही वाचा...वंचीत बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावला लॉकडाऊन, रस्त्यावर थाटली दुकान गंभीर जखमी अवस्थेत मुलगी सरकत शेजारील फ्लॅटपर्यंत पोहोचली. दरवाजा ठोठावून तिनं शेजाऱ्यांना बोलावून घेतलं. त्यांना सर्व हकिकत सांगतानाच ती बेशुद्ध पडली. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. ही संतापजनक घटना मंगळवारी (4 ऑगस्ट) संध्याकाळी घडली. दरम्यान, पीडीतेवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. तिने दिलेल्या जबाबानंतर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. मिळालेली माहिती अशी की, पीडित मुलीचं कुटुंब हे मूळचं बिहारचं आहे. कामानिमित्त ते दिल्लीत स्थलांतरीत झाले आहे. पीडितेचे आई-वडील व बहीण बाजूच्याच कंपनीत मजूराचे काम करतात. त्यामुळे पीडिता दिवसभर घरात एकटीच राहात होती. याच संधीचा फायदा घेत नराधमांनी तिला आपल्या वासनेचं शिकार केलं. पीडितेनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारीही ती घरात एकटीच होती. यादरम्यान दोन तरुण तिच्या घरात घुसले व त्यांनी तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यास तिने विरोध करताच त्यांनी तिला बेदम मारहाण केली एवढंच नाही तर शरीरावर कात्रीने वार करून गंभीर दुखापत केली. त्यानंतर नराधमांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या अत्याचारात बेशुद्ध झालेली पीडिता मृत झाल्याचे समजून आरोपी पसार झाले. मात्र, थोड्या वेळात शुद्धीवर आलेल्या पीडित मुलीनं गंभीर जखमी अवस्थेत ती फरफटत शेजारच्या दरवाजापर्यंत गेली. कसाबसा दरवाजा उघडून तिने मदतीसाठी शेजाऱ्यांना आवाज दिला. तिची अवस्था बघून सगळेच घाबरले. तिला तातडीनं रुगणालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान मुलीने पोलिसांना दिलेल्या जबानीत दोन आरोपींची नावं सांगितली आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हेही वाचा...धक्कादायक! हत्या केलेल्या गुन्हेगारानं कारागृहाच्या बॅरेकमध्येच लावला गळफास दुसरीकडे, आता या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतली आहे. नराधमांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Nirbhaya gang rape case

पुढील बातम्या