VIDEO: कुत्र्याला लाथ मारण्याचा नादात सुटला रिक्षावरील ताबा, अक्षरशः तोंडावर आपटला चालक

VIDEO: कुत्र्याला  लाथ मारण्याचा नादात सुटला रिक्षावरील ताबा, अक्षरशः तोंडावर आपटला चालक

भरधाव वेगात असलेल्या रिक्षासमोर (Auto Rickshaw) कुत्रा (Dog)आल्यानं मोठा अपघात (Road Accident) झाल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली आहे. ही विचित्र घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे.

  • Share this:

पुणे 16 मे : भरधाव वेगात असलेल्या रिक्षासमोर (Auto Rickshaw) कुत्रा (Dog) आल्यानं मोठा अपघात (Road Accident) झाल्याची घटना घडली आहे. रस्ता ओलांडण्यासाठी कुत्रा उभा असल्याचं पाहाताच भरधाव वेगात असलेल्या रिक्षाचालकानं कुत्र्याला लाथ मारुन बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी रिक्षा वेगात असल्यानं चालकाचा ताबा सुटला. यात रिक्षा दुभाजकावर जोरात आदळल्यानं रिक्षाचालक रस्त्यावर आदळला. तर, बराच वेळ रिक्षा चालकाविनाच पुढे जात राहिली. यानंतर आसपास उपस्थित असलेल्या काही लोकांनी ही धाव घेत ही रिक्षा थांबवली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली आहे. ही विचित्र घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे.

पिंपरी शहरतील शगुण चौकात शनिवारी दुपारी हा रिक्षा चालक आपली रिक्षा घेऊन जात होता. मात्र, रस्त्यात कुत्रा दिसताच त्यानं चालू रिक्षातूनच कुत्र्याला लाथ मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच प्रयत्नात त्याचा रिक्षावरील ताबा सुटला. रिक्षा जोरात आदळल्यानं तो रिक्षातून खाली कोसळला. मात्र, सुदैवानं या घटनेत जीवितहानी झालेली नाही.

या घटनेदरम्यान समोरुन एक भरधाव कारही येत होती. ही रिक्षा कारवर आदळली असती तर भीषण अपघात घडला असता. मात्र, आसपासच्या नागरिकांनी प्रसंगावधान राखल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. कुत्र्याला लाथ मारण्याच्या भलताच प्रयत्न या रिक्षाचालकाला चांगलाच महागात पडला आहे. लॉकडाऊनमुळं रस्ते मोकळे आहेत म्हणून आपली वाहनं अशी भरधाव चालवू नका, हेच या घटनेमुळे अधोरेखित झालं आहे. रिक्षाचालकाचा फाजीलपणा त्याच्या जीवावर बेतणारा तर ठरलाच मात्र त्याचवेळी त्याच्यामुळे कारचाही भीषण अपघात होता होता वाचला.

Published by: Kiran Pharate
First published: May 16, 2021, 11:14 AM IST

ताज्या बातम्या