Home /News /pune /

वापरलेल्या PPE किटपासून उपयुक्त वस्तू; पुण्यात CSIR-NCL आणि RIL करून दाखवलं Best from Waste

वापरलेल्या PPE किटपासून उपयुक्त वस्तू; पुण्यात CSIR-NCL आणि RIL करून दाखवलं Best from Waste

या वस्तू वापरलेल्या Covid-19 PPE Kit पासून तयार झाल्यात यावर विश्वास बसेल काय?

या वस्तू वापरलेल्या Covid-19 PPE Kit पासून तयार झाल्यात यावर विश्वास बसेल काय?

Covid-19 पासून बचावासाठी वारण्यात येणाऱ्या PPE किट नंतर फेकून दिल्या जातात. या टाकाऊ प्लास्टिकपासून काही टिकाऊ प्रॉडक्ट्स तयार करण्याचा प्रयोग पुण्यात CSIR-NCL आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) यांनी यशस्वी करून दाखवला आहे.

    पुणे, 23 सप्टेंबर: Covid-19 च्या काळात (Covid-19 Pandemic) वापरलेल्या PPE किटच्या कचऱ्यापासून (Covid-19 PPE waste) उपयुक्त प्लास्टिक मोल्डेड उत्पादनं तयार करण्याचा यशस्वी प्रयोग पुण्यात (Pune news) झाला. शहरातली राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL)आणि CSIR या केंद्र सरकारच्या वैज्ञानिक संस्थांमधून याबाबत प्रयोग झाले. रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) आणि CSIR-NCL यांनी संयुक्तपणे यासंदर्भातलं पायलट प्रोजेक्ट यशस्वी केलं आहे. या तीन संस्थांनी हाती घेतलेल्या पायलट प्रकल्पामध्ये, PPE कचऱ्याचं उपयुक्त आणि सुरक्षित उत्पादनांमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे. संपूर्ण देशभरात या प्रोजेक्टच्या धरतीवर मोठ्या प्रमाणात प्रारूप तयार करण्याची क्षमता यात आहे. COVID-19 महासाथीच्या उद्रेकामुळे वैयक्तिक वापराच्या उपकरणांचा Use and Throw प्रकार वाढला. 'या' कंपनीतल्या 500 कर्मचाऱ्यांचं उजळलं नशीब, झाले कोट्यधीश यात PPE किट,  हातमोजे, मुखपट्टी, इत्यादी एकदाच वापराच्या वस्तूंच्या मागणीत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. मे महिन्यामध्ये संपूर्ण भारतात प्रतिदिन 200 टनांपेक्षा जास्त COVID-19 संबंधित कचऱ्याची निर्मिती होत होती. आतापर्यंत जाळला जात होता PPE कचरा आतापर्यंत हा PPE कचरा, केंद्रीय कचरा व्यवस्थापन सुविधेमार्फत जाळला जात होता. कचऱ्याचं ज्वलन हे उर्जा केंद्रित आहे आणि त्यामुळे हरितगृह वायूंचे (Green House Gases) उत्सर्जन होतं आणि प्रदूषण होतं. देशभरात उपयुक्त प्रारूप CSIR-NCL, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि इतर कंपन्यांनी COVID-19 प्लास्टिक कचऱ्याच्या प्रभावी पुनर्वापरासाठी संपूर्ण प्रक्रिया विकसित करण्यास सुरवात केली आहे जेणेकरून मूल्यवर्धित प्लास्टिक उत्पादनं तयार होतील. COVID-19 प्लास्टिक कचऱ्याचं निर्जंतुकीकरण  होऊन विघटन न होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर शक्य होईल. सर्वप्रथम CSIR-NCL च्या टीमने भारतीय शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या पुनर्वापराच्या पायाभूत सुविधांचा फायदा घेऊन निर्जंतुक PPE प्लास्टिक कचऱ्यापासून (मे. निकी प्रिसिजन इंजिनियर्स ,पुणे येथे) प्रायोगिक तत्वावर मोल्डेड ऑटोमोटिव्ह वस्तूंचं उत्पादन केलं. पुणे परिसरातल्या 100 किलो कचऱ्याचं झालं रुपांतर एका MoU द्वारे CSIR-NCL आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ह्यांनी पायलट स्तरावर उत्पादन वाढवून ही संकल्पना राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा मार्ग आखला आहे. पुणे शहर परिसरात 100 किलोग्राम कचऱ्याचा प्रयोग यशस्वीरीत्या उद्योगांशी सहकार्य करून राबविला. यामध्ये APPL लिमिटेड, SKYi composites, मे. हर्षदीप अग्रो प्रोडक्ट्स ,मे. जयहिंद ऑटोटेक प्रा. लि. यांनी PPE कचऱ्यापासून मूल्यवर्धित उत्पादनं तयार केली. Explainer: सप्टेंबरमध्ये एवढा प्रचंड पाऊस का? मान्सूनचं चक्र बिघडलंय का? मे. पास्स्को एन्वायोरेनमेंटल सोलुशन्स या पुण्यातील बायोमेडिकल कचरा व्यवस्थापन कंपनीने फीड मटेरीअल (PPE कीट पासून तयार होणारा कच्चा माल) जमा करून निर्जंतुक केले. ह्या कचऱ्याचे लहान तुकडे/गोळ्यांमध्ये रुपांतर करण्यासाठी मे. APPL इंडस्ट्रीज लि. यांनी मोलाचे तांत्रिक सहाय्य केले. CSIR-NCL ने हे सुनिश्चित केले कि तयार झालेल्या पॉलिमरच्या गोळ्या/कणिका मध्ये उच्च दर्जा व आवश्यक सर्व गुण असतील, ज्यायोगे अखाद्य पदार्थ व स्वयंचलित वाहनांसाठी लागणारे सुटे भाग निर्माण करण्यासाठी योग्य असतील. CSIR-NCL ने हि पायलट चाचणी पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आवश्यक नियामक मान्यता मिळविल्या. काय आहे 'वन नेशन-वन हेल्थ कार्ड'? अशाप्रकारे बनवता येईल हा महत्त्वाचा दस्तावेज हा पायलट प्रकल्प CSIR (वैज्ञानिक संशोधन आणि विकास परिषद) ने केलेल्या आर्थिक सहकार्याने तसेच सहयोगी प्रयोगशाळा, CSIR-IIP डेहराडूनने केलेल्या सहकार्याने यशस्वीरीत्या पूर्ण झाला. एक शाश्वत हरित अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या सहाय्याने हा पायलट प्रकल्प संपूर्ण भारतात लागू केला जाऊ शकतो ज्यायोगे भारताच्या ह्या अस्पर्शित क्षेत्राच्या वाढीस चालना मिळेल आणि भारताच्या सामाजिक, पर्यावरणीय उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यास योगदान देऊ शकेल.
    First published:

    Tags: Coronavirus, Covid kit, Covid-19, Plastic, RIL

    पुढील बातम्या