Home /News /money /

'या' कंपनीतील 500 कर्मचारी झाले कोट्यधीश, कसं ते जाणून घ्या

'या' कंपनीतील 500 कर्मचारी झाले कोट्यधीश, कसं ते जाणून घ्या

या कंपनीचे 500 हून अधिक कर्मचारी कोट्यधीश (Crorepati) बनले आहेत. एखाद्या कंपनीचे कर्मचारी (Employee) कोट्यधीश होणं ही तशी आश्चर्याची बाब म्हणावी लागेल.

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर: देशातील बिझनेस सॉफ्टवेअर फर्म फ्रेशवर्क्स इंक (Freshworks Ink) ही कंपनी सध्या जोरदार चर्चेत आली आहे. अर्थात त्याला कारणही तसेच आहे. या कंपनीचे 500 हून अधिक कर्मचारी कोट्यधीश (Crorepati) बनले आहेत. एखाद्या कंपनीचे कर्मचारी (Employee) कोट्यधीश होणं ही तशी आश्चर्याची बाब म्हणावी लागेल. यात आणखी विशेष म्हणजे या 500 पैकी 70 कर्मचाऱ्यांचं वय हे 30 पेक्षा कमी आहे. फ्रेशवर्क्स इंक चेन्नई आणि सिलीकॉन व्हॅली बेस्ड कंपनीनं बुधवारी अमेरिकी एक्सचेंज नॅसडॅकमध्ये (Nasdaq) धमाकेदार पदार्पण केलं आहे. या सर्व घडामोडींची माहिती `झी न्यूज हिंदी`नं दिली आहे. आयटी कंपनी असलेल्या फ्रेशवर्क्सची स्थापना 2010 मध्ये चेन्नई (Chennai) येथे झाली. या कंपनीचे 120 पेक्षा अधिक देशांमध्ये ग्राहक असून, कंपनीचा सर्व महसूल (Revenue) अमेरिकेत मान्यताप्राप्त आहे. गिरीश मातृभूतम यांच्या या कंपनीत 4000 पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात. नॅसडॅकच्या यादीत समाविष्ट झालेली ही देशातील पहिली सॉफ्टवेअर एज सर्व्हिस (SAS) आणि युनिकॉर्न कंपनी आहे. विशेष म्हणजे कंपनीतील 76 टक्के कर्मचाऱ्यांचे या फर्ममध्ये शेअर (Share) आहेत.

LPG Cylinder: घरगुती गॅस सिलेंडरच्या सब्सिडीबाबत सरकारचा नवा प्लॅन, कुणाच्या खात्यात येणार पैसे?

 मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या समभागानं नॅसडॅक निर्देशांकांत आपल्या इश्यू प्राईसच्या तुलनेत 21 टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजेच 36 डॉलर या किंमतीसह प्रवेश केला. यासह कंपनीची मार्केट कॅप 12 अब्ज डॉलरवर पोहोचली. आज 76 टक्के कर्मचाऱ्यांचे फ्रेशवर्क्समध्ये शेअर आहेत. ``लिस्टिंगच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी मोठी कमाई केली असून, याचा मला खरोखर आनंद आणि अभिमान आहे,`` असं फ्रेशवर्क्सचे सीईओ गिरीश मातृभूतम यांनी म्हटलं आहे. ``कंपनीच्या या यशामुळं मी खूप खूश आहे. गेल्या 10 वर्षात माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या आणि फ्रेशवर्क्समध्ये योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती माझी जबाबदारी पार पाडण्याची संधी मला या आयपीओमुळं मिळाली,`` असं मातृभूतम यांनी सांगितलं.

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना DA मध्ये 3% वाढीआधी मिळणार हे 5 मोठे फायदे; वाचा सविस्तर

 ``आम्ही आमचा हा प्रवास सुरूच ठेवणार आहोत. आमच्या मिशनवर विश्वास ठेवणारे अनेक कर्मचारी आणि लोकांचे जीवन बदलण्याची मोठी संधी कंपनीला आहे. फ्रेशवर्क्ससाठी हा अगदी प्रारंभिक काळ असून, आम्ही यापुढेही असेच कार्यरत राहू,`` असं मातृभूतम यांनी स्पष्ट केलं.

Gold Price Today: सोन्याचांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या प्रति तोळाचा दर

 कर्मचारी कोट्यधीश बनल्याबाबत मातृभूतम म्हणाले, ‘असे प्रकार भारतामध्ये अधिक प्रमाणात होण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळं हे सारं शक्य झालं आहे, त्यामुळं हा त्यांचा हक्क आहे. कंपनीचा जसा जसा विस्तार होत गेला तसतसं कर्मचाऱ्यांनी त्यात योगदान दिलं. ज्या लोकांनी या महसूलासाठी हातभार लावला आहे. त्यांना त्याचं वाटप केलं पाहिजे. हा महसूल केवळ कंपनीचा मालक किंवा गुंतवणूकदार श्रीमंत होण्यासाठी निश्चित नाही. आम्ही हा एक नवा प्रयोग केला आणि त्यात आम्हाला यश मिळाले. त्यामुळे याप्रकारे वाटचाल सुरूच राहिल.’
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Money

पुढील बातम्या