Home /News /money /

OMG! पगारात रोख रक्कम नाही तर 'सोनं' ऑफर करते ही कंपनी; काय आहे यामागील कारण?

OMG! पगारात रोख रक्कम नाही तर 'सोनं' ऑफर करते ही कंपनी; काय आहे यामागील कारण?

कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना पगार म्हणून रोख रकमेऐवजी (Cash) सोनं (Gold) देत आहे. कंपनीच्या या अनोख्या धोरणाची सध्या सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा सुरू आहे.

    नवी दिल्ली, 16 मे : आपल्या कर्मचाऱ्यांची (Employee) सर्वतोपरी काळजी घेण्याविषयी प्रत्येक कंपनीचं स्वतःचं असं धोरण असतं. काही कंपन्या कर्मचाऱ्यांना पगारासह बोनस, हॉलिडे ऑफर किंवा फूड, मार्केटिंग कूपन देतात. तसंच काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या लग्नाच्या खर्चाची जबाबदारीही घेतात; मात्र सध्या इंग्लंडमधली (England) एक कंपनी जोरदार चर्चेत आहे. अर्थात त्यामागे कारणही तसंच आहे. ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना पगार म्हणून रोख रकमेऐवजी (Cash) सोनं (Gold) देत आहे. कंपनीच्या या अनोख्या धोरणाची सध्या सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा सुरू आहे. टेलिमनी (Telemoney) नावाची कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची जरा हटके पद्धतीनं काळजी घेत आहे. ही कंपनी कर्मचाऱ्यांना रोख पगाराऐवजी सोनं ऑफर करत आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅमेरून पॅरी यांचा स्वतःचा यामागे खास विचार आहे. हा विचार कर्मचाऱ्यांच्या बाबतीत योग्य आहे, असं ते मानतात. त्यांचा हा विचार विचित्र नसून, कर्मचाऱ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. त्यामुळे या गोष्टीचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. प्रायोगिक तत्त्वावर आहे रोख रकमेऐवजी सोनं देण्याचं धोरण लंडनच्या CityAM.com च्या वृत्तानुसार, इंग्लंडमधली टेलिमनी ही कंपनी आर्थिक सेवा पुरवते. आता ही कंपनी कर्मचाऱ्यांचं वर्तमान आणि भविष्य लक्षात घेऊन ती त्यांना पगाराऐवजी सोनं घेण्याची ऑफर देत आहे. सद्यस्थितीत कंपनीतल्या वरिष्ठ पदावर असलेल्या 20 जणांना या पॉलिसीचा (Policy) लाभ देण्यात आला आहे. या प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांचा फायदा दिसून आल्यास कंपनी उर्वरित कर्मचाऱ्यांसाठीदेखील हेच धोरण स्वीकारणार आहे. सध्या हे नवं वेतन धोरण प्रायोगिक तत्त्वावर राबवलं जात आहे. ``कोरोनामुळे (Corona) परिस्थिती बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना पगार पौंडमध्ये देऊन कोणताही फायदा नाही. कारण त्याचं मूल्य कमी होत आहे,`` असं मुख्य कार्यकारी अधिकारी कॅमेरून पॅरी यांनी सांगितलं. कर्मचाऱ्यांचं भविष्य असेल उज्ज्वल कॅमेरून म्हणाले, ``पौंडच्या घसरणीनंतर, सोन्यात गुंतवणूक केली तर ती कर्मचाऱ्यांना महागाईच्या तुलनेत नेहमीच पुढे ठेवेल. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी कंपनीने सोनं देण्याचं धोरण सुरू केलं आहे. पगार म्हणून रोख रक्कम घ्यायची की सोनं हा निर्णय सर्वस्वी कर्मचाऱ्यांचा असेल.`` टेलिमनी कंपनीच्या या नव्या धोरणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. कंपनीनं आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी पूर्वनियोजन केलं आहे आणि विशेष म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांचाही विचार केला आहे, असं म्हणत अनेक जण या कंपनीचं कौतुक करत आहेत.

    First published:

    Tags: England, Social media

    पुढील बातम्या