निसर्ग चक्रीवादळाचं थैमान.. जाणून घ्या पुण्यात कुठे आणि किती पडला पाऊस?

निसर्ग चक्रीवादळाचं थैमान.. जाणून घ्या पुण्यात कुठे आणि किती पडला पाऊस?

पुणे शहरासह जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

  • Share this:

पुणे, 4 जून: निसर्ग चक्रीवादळ (nisarga cyclone) कोकण किनारपट्टीवरून पुढे सरकल्यानंतरही मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

दरम्यान आज मुंबईसह, ठाणे, उपनगर, पुणे, कोकण, नाशिक, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (imd) देण्यात आला आहे. त्याचबरोबर पुणे शहरासह जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

कालच्या निसर्ग चक्रीवादळाच्या वाऱ्यामुळे भीमा खोऱ्यात टेमघर येथे 184 तर कृष्णा खोऱ्यातील मोळेश्वर कण्हेर येथे 175 पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा...मोठी बातमी! पुण्याला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा, मायलेकासह चार जणांचा मृत्यू

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही साखळी धरणक्षेत्रात दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. खडकवासला 37, पानशेत आणि वरसगाव येथे 92, टेमघर 171 मिलीमीटर पाऊस पडला. टेमघर येथे पडलेल्या पावसामुळे धरणातील पाण्यात किरकोळ वाढ झाली आहे.

भीमा खोऱ्यातील पानशेत धरणातील शिरकोली येथे 115, लवासा दासवे येथे 152, वेल्हे गुंजवणी धरणाजवळच्या घीसर 129, वेल्हे 86, भट्टी वाघदरा 113, भाटघर धरणातील भुतोंडे 100, पिंगारी 84, शिरगाव, 98 नीरा-देवघर 101, हिरडोशी 91, कासारसाई 46, आंबेघर 42, कुंभेरी 119, सवाळे मावळ 65, नाझरे सासवड 22, पवना 56, खिरेश्वर जुन्नर 55, राजापूर डिंभे 69, डिंभे आंबेगाव 78, पिंपळगाव जोगा मढ 72, भामा आसखेड 102 मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात आली.

सातारा जिल्ह्यातील कृष्णा खोऱ्यातही चांगला पाऊस पडला..

महाबळेश्वर 163, रांजणी 142, मोळेश्वर कण्हेर 171, कोयनानगर 136, प्रतापगड 103, उरमोडी कास 120, धोम बलकवडी धरण 94, जांभळी धोम 136, वळवण 96, उरमोडी सांडवली 117, तारळे पाटण 63, बेलवडे पाटण76, येळगाव कराड 42, नागेवाडी वाई 81, ठोसेघर 89, उरमोडी66, नवजा 111, कोयनानगर 136, निवळे 97, चाफळ 103, कादवी धरण 67 मिलीमीटर पाऊस झाला आहे. सांगली जिल्ह्यातील वारणात 71मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा...VIDEO : मुंबईत धुवांधार! पहिल्याच पावसात मुंबईची झाली ही दैना

कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर शाहूवाडी कसारी 129, रेवाचिवाडी 106, गगनबावडा 116, कुंभी धरण 80, दाजीपूर राधानगरी 60, तुळशी पडसाली 48 मिलिमीटर पाऊस पडला आहे.

First published: June 4, 2020, 2:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading