मुंबई, 4 जून : Cylone Nisarga चं संकट टळलं असलं, तरी त्याचा परिणाम म्हणून सकाळपासून मुंबईत धुवांधार पाऊस कोसळत आहे. मान्सूनपूर्वीचा हा पहिलाच पाऊस हवेत गारवा आणतोय. पण शहराची या पहिल्याच पावसाने दुर्दशा केली आहे. सखल भागात पाणी साठायला सुरुवात झाली आहे. सायन आणि किंग सर्कल भागात या पहिल्याच पावसाने पाणी साठलं होतं. शीव पोलीस ठाण्याच्या दारातच गुडघाभर पाणी साठलं आणि मान्सूनची महापालिकेची तयारी उघडी पडली.
त्याचप्रमाणे मुंबईची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी बांधलेल्या उड्डाणपुलांखाली पाणी साठलं आहे. यामुळे काही गाड्या बंद पडल्या. तर अनेकांचे हाल झाले. फक्त 60 सेकंदांमध्ये 10 घरांवर कोसळलं वडाचं झाड, पाहा थरारक Live Video Coronavirus मुळे अद्याप शहर पुरतं कार्यरत झालेलं नाही. शहरात जमावबंदी लागू आहे. सार्वजनिक वाहतूनक अद्याप पूर्ववत झालेली नाही. त्यामुळे रस्त्यावर फारशी गर्दी नाही. तरीही या पावसाचं संकट मोठं वाटलं. नालेसफाई आणि मान्सूनपूर्व तयारीत मुंबई महापालिका कमी पडणार का असे प्रश्न विचारण्यात येथ आहेत.
वादळाचं संकट टळल्यानंतरच मुंबईत मुसधळधार पावसाला सुरुवात झाली. पहिल्याच पावसात सायन, किंग सर्कल भागात पाणी साठायला सुरुवात झाली आहे.. पाहा मुंबईची पहिल्या पावसातली दैना#MumabiRains #CycloneNisarg pic.twitter.com/AvTS8FwQch
— News18Lokmat (@News18lokmat) June 4, 2020
प्रत्यक्ष चक्रीवादळाचा तडाख्यातून मुंबई वाचली असली, तरी चक्रीवादळानंतर मुंबईत मोठ्या प्रमाणात बुधवारी झाडं कोसळल्यानं आणि इमारतींचे पत्रे उडाल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. गुरुवारी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. दिवसभर पावसाचा जोर कायम असेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.