Home /News /pune /

मोठी बातमी! पुण्याला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा, मायलेकासह चार जणांचा मृत्यू

मोठी बातमी! पुण्याला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा, मायलेकासह चार जणांचा मृत्यू

मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

    पुणे, 4 जून: निसर्ग चक्रीवादळ (nisarga cyclone) कोकण किनारपट्टीवरून पुढे सरकल्यानंतरही मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात चक्रीवादळामुळे मायलेकाचा मृत्यू झाला आहे. वाहगाव येथील मंजाबाई नवले आणि नारायण नवले अशी मृत मायलेकाची नावं आहे. मंजाबाई यांचा काल मृत्यू झाला होता तर नारायण नवले यांचा गुरूवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. इतर दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हेही वाचा..VIDEO : मुंबईत धुवांधार! पहिल्याच पावसात मुंबईची झाली ही दैना पुणे जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे 57 अंगणवाडी, 31 जिल्हा परिषदेच्या शाळा आणि 4 ग्रामपंचायत कार्यालयांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक घरांवरील पत्रे उडून गेली आहेत. भिंतीला तडे घेते आहेत. शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालयातील रेकॉर्ड आणि साहित्य पूर्णपणे भिजलं आहे.  पुणे शहरासह जिल्ह्यात चक्रीवादळाच्या थैमानात वीज यंत्रणा विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी वादळात विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. पुण्यातील जवळपास 540 वीज वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडीत झाल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई, ठाणे आणि उपगरांमध्ये गुरुवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तर दक्षिण मुंबईत रिमझिम पाऊस आहे. दरम्यान आज मुंबईसह, ठाणे, उपनगर, पुणे, कोकण, नाशिक, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (imd) देण्यात आला आहे. कालच्या निसर्ग चक्रीवादळाच्या वाऱ्यामुळे भीमा खोऱ्यात टेमघर येथे 184 तर कृष्णा खोऱ्यातील मोळेश्वर कण्हेर येथे 175 पावसाची नोंद झाली आहे.  पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही साखळी धरणक्षेत्रात दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. खडकवासला 37, पानशेत आणि वरसगाव येथे 92, टेमघर 171 मिलीमीटर पाऊस पडला. टेमघर येथे पडलेल्या पावसामुळे धरणातील पाण्यात किरकोळ वाढ झाली आहे. भीमा खोऱ्यातील पानशेत धरणातील शिरकोली येथे 115, लवासा दासवे येथे 152, वेल्हे गुंजवणी धरणाजवळच्या घीसर 129, वेल्हे 86, भट्टी वाघदरा 113, भाटघर धरणातील भुतोंडे 100, पिंगारी 84, शिरगाव, 98 नीरा-देवघर 101, हिरडोशी 91, कासारसाई 46, आंबेघर 42, कुंभेरी 119, सवाळे मावळ 65, नाझरे सासवड 22, पवना 56, खिरेश्वर जुन्नर 55, राजापूर डिंभे 69, डिंभे आंबेगाव 78, पिंपळगाव जोगा मढ 72, भामा आसखेड 102 मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात आली. सातारा जिल्ह्यातील कृष्णा खोऱ्यातही चांगला पाऊस पडला.. महाबळेश्वर 163, रांजणी 142, मोळेश्वर कण्हेर 171, कोयनानगर 136, प्रतापगड 103, उरमोडी कास 120, धोम बलकवडी धरण 94, जांभळी धोम 136, वळवण 96, उरमोडी सांडवली 117, तारळे पाटण 63, बेलवडे पाटण76, येळगाव कराड 42, नागेवाडी वाई 81, ठोसेघर 89, उरमोडी66, नवजा 111, कोयनानगर 136, निवळे 97, चाफळ 103, कादवी धरण 67 मिलीमीटर पाऊस झाला आहे. सांगली जिल्ह्यातील वारणात 71मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर शाहूवाडी कसारी 129, रेवाचिवाडी 106, गगनबावडा 116, कुंभी धरण 80, दाजीपूर राधानगरी 60, तुळशी पडसाली 48 मिलिमीटर पाऊस पडला. निसर्ग चक्रीवादळामुळे शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात महावितरणच्या वीजयंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. मावळ, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यांमधील 340 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या कारणासाठी बंद ठेवण्यात आला आहे. संभाव्य नुकसानीचा धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला. हेही वाचा.. मुंबई की महाराष्ट्र! हायकोर्टावरून नवा वाद, सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारला फटकारलं पुणे शहराच्या विविध भागात आणि पिंपरी चिंचवड व भोसरीमधील बहुतांश भागात वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. मावळ, खेड तालुक्यांमधील राजगुरुनगर, चाकण, वडगाव, तळेगाव, लोणावळा या परिसरातील 82 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. यासह जुन्नर, आंबेगाव तालुक्यांमधील भीमाशंकर, घोडेगाव, नारायणगाव, जुन्नर, पिंपळवंडी, नारायणगाव, नाणेघाट, मंचर, डिंभे, आपटाळे, ओतूर, आळेफाटा या परिसरातील सर्व 215 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा देखील बंद ठेवण्यात आला आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Pune news

    पुढील बातम्या