मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Pune Bypoll election Results : काँग्रेसने भाजप 'को पटक दिया', कसब्यात रवींद्र धंगेकर विजयी

Pune Bypoll election Results : काँग्रेसने भाजप 'को पटक दिया', कसब्यात रवींद्र धंगेकर विजयी

Pune Bypoll Election Live Updates :  काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर 11 मतांनी विजयी झाले आहे.

Pune Bypoll Election Live Updates : काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर 11 मतांनी विजयी झाले आहे.

Pune Bypoll Election Live Updates : काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर 11 मतांनी विजयी झाले आहे.

पुणे, 02 मार्च :  पुण्यात आजचा निवडणूक निकालाच आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे.  बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघामध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे.  काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी झाले आहे.

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरूवात झाली. पोस्टल मतदानामध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राहिली. मतमोजणीपासून धंगेकर यांनी आता 11 हजार 40 मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. भवनी पेठे हा भाजपचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये सुद्धा भाजपची पिछेहाट झाली. विशेष म्हणजे, भाजपने कसबा पोटनिवडणुकीमध्ये सर्व ताकदपणाला लावली होती. मनसे, शिवसेना शिंदे गटाने सुद्धा भाजपला पाठिंबा दिला होता. पण, पुणेकरांनी भाजपला धक्का देत रवींद्र धंगेकर यांना निवडून दिलं आहे. रवींद्र धंगेकर यांच्या विजयाची चाहूल लागताच काँग्रेसच्या समर्थकांनी जोरदार जल्लोषाला सुरुवात केली आहे.

पुण्यात कसबाची पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. भाजपने टिळक वाड्याला नाकारून नवीन उमेदवार मैदानात उतरला. त्यामुळे सुरवातीपासून भाजपमध्ये नाराजीचे सूर उमटले होते. अखेर ही नाराजी भाजपला महागात पडली आहे. एवढंच नाहीतर गिरीश बापट यांनीही नाराजी दर्शवत प्रचारापासून दूर राहिले होते. भाजपमधील अंतर्गत नाराजी अखेरीस भाजपच्या पथ्यावर पडली आहे.  रवींद्र धंगेकर यांनी तब्बल 11 हजार 40 मतांनी विजय मिळवला आहे. धंगेकर यांच्या बाजूने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जोरदार प्रचार केला होता. आदित्य ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यांनीही प्रचार केला होता. महाविकास आघाडीने एकीचे बळ दाखवून पूर्ण ताकदीने प्रचार केला. अखेरीस महाविकास आघाडीची मेहनत कामी आली आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Congress, NCP, Pune, Pune Bypoll Election, Shiv sena