नवी दिल्ली, 27 मार्च : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत आहे. सुरक्षितता म्हणून देशभरात लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आलं आहे. मात्र कर्मचारी कामात व्यत्यय न आणता वर्क फ्रॉम होम (Work From Home) करीत आपलं काम प्रामाणिकपणे करीत आहेत. याचा भाग म्हणून आयटी कंपनी कॉग्निझंट (Cognizant) पुढील महिन्यात भारत (India) आणि फिलिपिन्समधील (philippines) सुमारे दोन तृतीयांश कर्मचार्यांना 25 टक्के जादा पगार देणार आहे. कंपनीने शुक्रवारी सांगितले की, असोसिएट आणि कनिष्ठ स्तरावरील कर्मचार्यांना एप्रिल महिन्यासाठी 25 टक्के जादा पगार देण्यात येणार आहे. याचा फायदा भारतातील सुमारे 1.30 लाख कर्मचार्यांना फायदा होणार आहे. संबंधित - कोरोनाशी लढा देता देता डॉक्टर धारातीर्थी, 5000 कोरोना पॉझिटिव्ह कंपनीचे म्हणणे आहे की, कोरोना विषाणूच्या संकटाच्या परिस्थितीतही कर्मचारी सेवा सुरू ठेवत असाधारण काम करीत आहेत, म्हणून त्यांना हा पगार प्रोत्साहन म्हणून देण्यात येईल. त्यांच्या पगाराच्या आधारावर अतिरिक्त रक्कम निश्चित केली जाईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की डिसेंबर 2019 पर्यंत भारतातील कंपनीच्या एकूण कर्मचार्यांची संख्या 2,03,700 होती. कंपनीने सांगितले, वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, कर्मचार्यांना पाठवलेल्या मॅसेजमध्ये कंपनीचे मुख्य कार्यकारी ब्रायन हम्परिस म्हणाले की, एप्रिलच्या पगारासह हा अतिरिक्त पगार एकत्र केला जाईल. त्यानुसार पगार ठरवला जाईल. संबंधित - 6 दिवसांत 100 लोकांना भेटला, 23 जण पॉझिटिव्ह, लाखोंना संसर्गाचा धोका कंपनीकडून बक्षीस.. ते म्हणाले, ‘अशा कठीण प्रसंगीही कर्मचारी ग्राहकांसाठी सेवा सुलभ करण्यात गुंतलेले आहेत आणि त्यांच्या समर्पणाची, प्रामाणिकपणाची आणि धैर्याची प्रशंसा आहे. भारत आणि फिलिपिन्समधील आमच्या असोसिएटने सेवा सुरू ठेवण्याच्या प्रयत्नांचा आम्ही आदर करतो. आम्ही एप्रिल महिन्यात सहकारी व निम्न स्तरावरील कर्मचार्यांना त्यांच्या मूलभूत पगाराच्या आधारे 25 टक्के अधिक पगार देणार आहोत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







