पुणे, 22 ऑगस्ट : पुण्यातील हडपसरमध्ये (Hadapsar Pune) भरदिवसा महिलेला लुटण्यात आले आहे. रस्त्यावरुन चालत जात असताना महिलेची पर्स आणि मोबाइल लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हडपसरमधील यश रवी पार्क सोसायटी (Yash Ravi Park Society Pune) समोर ही घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Woman robbed Caught in CCTV) झाला आहे. दिवसाढवळ्या महिलेच्या हातातील पर्स आणि मोबाईल चोरी झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात गेतले असून त्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
पत्नीच्या प्रियकराला मारण्यासाठी तांत्रिकाकडे गेलेल्या पतीचीच झाली हत्या; रहस्यमयी घटनेत हादरवणारा खुलासा घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून त्या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की, दोन चोरटे एकमेकांसोबत बोलत येत आहेत. त्याचवेळी रस्त्यावरुन जात असलेल्या महिलेच्या हातातील पर्स आणि मोबाइल त्यांनी हिसकावला. यानंतर दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. निर्मनुष्य रस्त्यावर किंवा वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांना लुटले जात असल्याने खळबळ उडाली आहे. आरोपींनी पर्स आणि मोबाईल हिसकावून पळ काढल्यावर पीडित महिलेने त्या आरोपींचा पाठलाग केला. जवळपास एक किलोमीटरपर्यंत ही महिला चोरट्यांचा पाठलाग करत होती. मात्र, चोरटे या महिलेला चकवा देत पसार झाले.