मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पत्नीच्या प्रियकराला मारण्यासाठी तांत्रिकाकडे गेलेल्या पतीचीच झाली हत्या; रहस्यमयी घटनेत हादरवणारा खुलासा

पत्नीच्या प्रियकराला मारण्यासाठी तांत्रिकाकडे गेलेल्या पतीचीच झाली हत्या; रहस्यमयी घटनेत हादरवणारा खुलासा

तांत्रिकाकडे येत असतानाच याच काळात नीरज दीक्षित याची भेट शैलेंद्र नावाच्या एका व्यक्तीसोबत झाली. शैलेंद्र आपल्या भावासाठी तांत्रिकाकडे येत असे. काहीच दिवसांत शैलेंद्र आणि नीरज यांची मैत्री झाली.

  • Published by:  Kiran Pharate

लखनऊ 22 ऑगस्ट : एका पतीला आपल्या पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध (Extramarital Affair of Wife) असल्याचा संशय होता. यामुळे त्यानं तांत्रिकांची मदत घेतली. जेणेकरून पत्नीच्या प्रियकराला आपला रस्त्यातून बाजूला करता येईल. मात्र, तांत्रिकाच्या नादात पतीचीच हत्या (Murder) झाली. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूरमधील (Kanpur) आहे.

तांत्रिकाकडे येत असतानाच याच काळात नीरज दीक्षित याची भेट शैलेंद्र नावाच्या एका व्यक्तीसोबत झाली. शैलेंद्र आपल्या भावासाठी तांत्रिकाकडे येत असे. काहीच दिवसांत शैलेंद्र आणि नीरज यांची मैत्री झाली. यादरम्यान शैलेंद्रनं नीरजला असं म्हणत त्याच्याकडून 75 हजार रुपये घेतले की तांत्रिक पूजा करून त्याच्या पत्नीच्या प्रियकराची हत्या करेल. मात्र, काही दिवसांनी नीरजनं शैलेंद्रला म्हटलं, की अजूनही काहीच झालेलं नाही आणि दोघांमध्ये भांडण सुरू झालं.

आणखी एका ज्वेलर्सची हत्या, भर दिवसात दुकानात घुसून केले सपासप वार, VIDEO

यानंतर शैलेंद्रनं नीरजला म्हटलं, की तुला हमीपुरच्या मोठ्या तांत्रिकाला भेटवतो. नीरजही तयार झाला आणि त्याच्यासोबत गेला. मात्र, यादरम्यान शैलेंद्रनं आपले मित्र धर्मेंद्र आणि शामू यांच्या मदतीनं नीरजची हत्या केली. सध्या पोलिसांनी शैलेंद्र आणि धर्मेंद्र या दोन आरोपींना अटक केली आहे. शामू अजूनही फरार आहे. 13 ऑगस्टला फजलगंज येथून बेपत्ता झालेल्या नीरजचा मृतदेह 17 ऑगस्टला हमीरपुरच्या जंगलात आढळला होता.

दारूच्या नशेत आईला विसरला, मुसळाने मारहाण करून घेतला जीव, बीडमधील घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी घटना लपवण्यासाठी तीन जिल्ह्यांचा उपयोग केला आणि घटनेला नवं वळण देण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी कानपूरच्या फजलगंज येथून तांत्रिकाला भेटवण्याच्या बहाण्यानं नीरजला आपल्यासोबत नेलं. यानंतर हमीरपुरमध्ये त्याची हत्या केली. हत्येनंतर त्याची गाडी फतेहपूर जिल्ह्यात आणून जाळली. मात्र, कॉल डिटेलमुळे या सर्वांची पोलखोल झाली.

First published:

Tags: Murder Mystery, Murder news