Home /News /pune /

पुण्यातील वानवडी सामूहिक बलात्कार प्रकरण, पीडित मुलीवर ठाण्यातही अत्याचार झाल्याचं समोर, आरोपीला अटक

पुण्यातील वानवडी सामूहिक बलात्कार प्रकरण, पीडित मुलीवर ठाण्यातही अत्याचार झाल्याचं समोर, आरोपीला अटक

Pune Wanwadi gang rape case: पुण्यातील वानवडी सामूहिक बलात्कार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुणे, 16 सप्टेंबर : पुण्यातील वानवडी (Wanwadi Police, Pune) परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराच्या (Minor girl gang raped) घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित मुलीवर ठाण्यातही बलात्कार (victim girl raped in Thane) झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी ठाण्यातून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. त्यामुळे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या एकूण आरोपींची संख्या 17 झाली आहे. पुण्यातील या सामूहिक बलात्कार प्रकरणाचे धागेदोरे ठाण्यापर्यंत पोहोचले आहेत. या संपूर्ण प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. ठाण्यातून अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 20 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 12 वर्षीय मुलीवर दोन महिने सामूहिक बलात्कार, आठवड्याभरातील तिसऱ्या घटनेने पुणे हादरलं 31 ऑगस्ट रोजी गावी जाण्यासाठी पीडित मुलगी पुणे स्टेशन येथे आली होती. मात्र, रात्री उशिरा गाडी नसल्यामुळे राहण्याची व्यवस्था करतो, असं सांगून रिक्षाचालकाने तिला विश्वासात घेतलं आणि वानवडी येथे नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला होता. सुरुवातील सहा रिक्षाचालक आणि रेल्वेचे कर्मचाऱ्यांनी या पीडितेवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर एकूण 16 आरोपी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पुणे पुन्हा हादरलं! स्टेशन परिसरात फूटपाथवर झोपलेल्या 6 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार या घटनेनंतर पीडित मुलगी मुंबईला आली असता ठाण्यातील आरोपीने तिला रेल्वे स्थानकात पाहून तिची विचारपूस केली. त्यानंतर त्याने पीडित मुलीला आपल्या घरी नेले आणि मग तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती आता उघड झाली आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Gang Rape, Pune, Thane

पुढील बातम्या