मराठी बातम्या /बातम्या /पुणे /12 वर्षीय मुलीवर दोन महिने सामूहिक बलात्कार, आठवड्याभरातील तिसऱ्या घटनेने पुणे हादरलं

12 वर्षीय मुलीवर दोन महिने सामूहिक बलात्कार, आठवड्याभरातील तिसऱ्या घटनेने पुणे हादरलं

Pune Crime News: पीडित मुलीने घरी आईला हा प्रकार सांगितल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Pune Crime News: पीडित मुलीने घरी आईला हा प्रकार सांगितल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Pune Crime News: पीडित मुलीने घरी आईला हा प्रकार सांगितल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

रायचंद शिंदे, प्रतिनिधी

पुणे, 10 सप्टेंबर : गेल्या आठवड्याभरात पुणे जिल्ह्यात (Pune District) तीन अत्याचाराच्या घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगरच्या प्राश्चिम भागातील एका गावात 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा जणांनी धमकावून दोन ते अडीच महिने लैगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने खेड पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. तीन आरोपींना खेड पोलिसांनी अटक केली असून तीन आरोपी फरार आहेत. (Pune minor girl gang raped by 6)

या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्या घुमटकर, आकाश सुनिल शिंदे, परेश माणिक ढमाले, अवधुत संतोष कनसे, साईनाथ मुळुक, सुरज सुनिल रोडे यांना पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असुनही सोन्या घुमटकर याने धमकी देत जबरदस्तीने पीडित मुलीबरोबर मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले होते. तसेच इतर पाच जणांनी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी पीडित मुलीला धमकावत जबरदस्ती शारीरिक संबंध करून लैंगिक अत्याचार केला.

पीडित मुलीने घरी आईला हा प्रकार सांगितल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. याबाबत खेड पोलिसांनी सोन्या घुमटकर, आकाश शिंदे, सुरज रोडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. परेश ढमाले, अवधुत कणसे, साईनाथ मुळूक हे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक महिला पोलीस निरिक्षक वर्षाराणी घाटे करत आहेत.

आठवड्याभरात तिसरी घटना

पुण्यातील वानवडी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर 13 जणांनी बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. हे प्रकरण ताजं असतानाच पुणे स्टेशन परिसरातून आणखी एका अल्पवयीन मुलीच्या बलात्काराचं वृत्त समोर आलं. पुण्यातील 39 वर्षीय रिक्षावाल्याने या मुलीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केला.

First published:
top videos

    Tags: Crime, Pune