पुणे, 09 डिसेंबर : मनसेचे पुण्याचे डॅशिंग नेते वसंत मोरे हे मागच्या कित्येक दिवसांपासून मनसेमध्ये नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान राज ठाकरे पुण्यात आल्यानंतर वसंत मोरे यांना गाडीत घेतल्याने नाराजी दूर झाल्याची चर्चा होती परंतु पुन्हा वसंत मोरें मनसेतून बाहेर पडणार अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान बाहेर पडणार की त्यांची हकालपट्टी होणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पक्षांतर्गत वादामुळे ते राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते परंतु त्यांची भेट नाकारली असल्याची माहिती समोर आली आहे.
वसंत मोरे यांच्या नाराजीबाबत मागच्या कित्येक दिवसांपासून चर्चा सुरू असताना वसंत मोरे राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते. परंतु राज ठाकरेंनी त्यांची भेट नाकारली आहे. पक्षांतर्गत वादामुळे राज ठाकरे यांना भेटायला मुंबईला निघालेल्या वसंत मोरेंना भेट नाकारून पुण्यात अमित ठाकरे यांना भेटायला परत पाठवल्याचे बोलले जात आहे. दरम्यान वसंत मोरे यांची हकालपट्टी होणार का यावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
हे ही वाचा : उद्धवजींकडे एकच अस्त्र टोमणे अस्त्र त्यामुळे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंच्या 'त्या' आरोपांवर हल्लाबोल
वसंत मोरेंनी व्यक्त केली थेट नाराजी
मनसेचे नेते वसंत मोरे हे मागच्या काही दिवसांपासून पक्षात नाराज आहेत, त्यातच आता अजित पवार यांनी वसंत मोरे यांना पक्षात यायची ऑफर दिली. अजित पवारांच्या या ऑफरवर वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादांच्या या ऑफरनंतर वसंत मोरेंची खदखद बाहेर आली आहे. वसंत मोरे यांनी पुण्यातले मनसेचे नेते बाबू वागसकर यांचं थेट नाव घेतलं आहे.
'मला डावलण्यामागे पक्षाचे नेते आहेत पुण्यातले, त्यांची नावं सगळ्यांना माहिती आहेत. पुणे शहरात एकच नेता आहे. बाबू वागसकर दुसरं कोण. राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपमध्ये जायचा माझा विचार नाही. साहेबांना बघून मी पक्षात आहे. या लोकांनी मला ढकलत ढकलत चालवलं आहे सगळं,' अशी खंत वसंत मोरे यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा : तात्या मी वाट पाहतोय, अजित पवारांची मनसेच्या मोठ्या नेत्याला ऑफर
'चंद्रकातदादा पण मला बोलवता ना, मनसेचे तात्या इकडे या, असे बोलले. माझ्यावर शिक्का पडला आहे. माझ्याच नेत्यांना मला एकटं पाडायचे आहे. त्यांना बहुतेक माझी प्रसिद्धी खुपतेय. मी पक्ष सोडणार नाही, पण वेदना होतात. बाकी पक्ष माझ्या कामाची दखल घेतात. पण माझेच सहकारी मला पक्षाबाहेर ढकलू पाहताहेत हे खूप वेदनादायी आहे', अशी भावना वसंत मोरे यांनी व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Pune, Pune (City/Town/Village), Raj Thackeray (Politician)