जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पालिकेनं जाहीर केला नवा आदेश

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पालिकेनं जाहीर केला नवा आदेश

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पालिकेनं जाहीर केला नवा आदेश

पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबत नवीन आदेश काढला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 18 जून : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 10 हजार पार झाला आहे.  कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेनं शहरात 16 खासगी रूग्णालयातील 80 टक्के बेड्स राखीव ठेवले आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबत नवीन आदेश काढला आहे. या आदेशानुसार, पुण्यात खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड्स हे कोरोनाबाधित रुग्णांसाठी वापरण्यात येणार आहे. राखीव बेड्सपैकी 50 टक्के खाटा कोरोना पेशंट्सना द्याव्या लागणार आहे. ‘माझं लग्न थांबवा’, पोलिसाच्या मुलीनं थेट पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांना केली विनंती परंतु, खासगी रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित रुग्ण दाखल झाल्यावर  खासगी रुग्णालयामधील कोरोना रूग्णांचे बील मात्र, यापुढे पालिका भरणार नाही, असं आयुक्त गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. पुणे शहरात  कोरोना साथ नियंत्रणावर पालिकेचे आतापर्यंत 151 कोटी खर्च केले आहे. त्यामुळे यापुढील कोरोनाबाधित रुग्णावरील खासगी रुग्णालयातील खर्च उचलण्यास पालिकेनं नकार दिला आहे.  खासगी रुग्णालयांनी शासकीय रेटनुसारच बिल घ्यावे, अन्यथा कारवाई, केली जाईल असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे. कंन्टेमेंट झोनची फेररचना जाहीर दरम्यान, पुण्यात कोरोना कंन्टेमेंट झोनची फेररचना जाहीर झाली असून पुण्यात आता 73 कंन्टेमेंट झोन जाहीर असतील. शहरात यापूर्वी 66 कंन्टेमेंट झोन होते पूर्वीच्या 66 पैकी 24 वगळले तर 32 नव्याने वाढले तर 11 कंटेंटमेट झोनची फेररचना केली गेली आहे. पुणे मनपाचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी न्यूज18 लोकमतला ही माहिती दिली. …आता तुम्ही दिल्लीत आहात, तुम्हालाच प्रतिकार करावा लागेल,सेनेचा मोदींना टोला शहराच्या आता सर्वच भागात हे कोरोना बाधित झोन असणार आहेत. शहरातली 5 हजार दुकाने खुली झाली आहेत. गर्दी वाढणार असल्याने धोकाही वाढला असून नागरिकांनी नियमांचं सक्तीने पालन करावं, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात