‘माझं लग्न थांबवा’, पोलिसाच्या मुलीनं थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना केली विनंती; VIDEO VIRAL

‘माझं लग्न थांबवा’, पोलिसाच्या मुलीनं थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना केली विनंती; VIDEO VIRAL

या व्हिडीओमध्ये, रीनानं राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याकडे एक मागणी केली आहे.

  • Share this:

राजेंद्र प्रसाद शर्मा

अलवर, 18 जून : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील (Alwar district) मुंडावार परिसरात राहणाऱ्या एका 22 वर्षीय मुलीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. बीएससीची विद्यार्थिनी असलेली 22 वर्षीय रीना सिंग हिचा व्हिडीओ व्हायरल होण्यामागचं कारणही वेगळं आहे. या व्हिडीओमध्ये, रीना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याकडे आपलं लग्न थांबवण्याची मागणी करत आहे. तिच्या इच्छेविरोधात लग्न केले जात असल्याचं ती या व्हिडीओमध्ये सांगत आहे.

जयपूरमध्ये कुटुंबासमवेत राहणारी रीना व्हिडीओमध्ये, “माझ्या आईने खोटे बोलून मला गावी आणलं आणि 20 मेला माझा साखरपूडा केला. हा साखरपूडा माझ्या इच्छेविरोधात झाला आहे. आता 1 जूलै रोजी माझं लग्न ठरवण्यात आलं आहे. या लग्नाला माझी संमती नाही आहे. मुलगा कोण आहे. हे सुद्धा मला माहित नाही”, असे सांगत आहे. तसेच, जोपर्यंत मला आणि माझ्या धाकट्या बहिणीला नोकरी लागत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, असेही ती म्हणत आहे.

वाचा-साडी खरेदीवर महिलांना मिळतंय 'कोरोना कवच',वाचा काय आहे व्यापाऱ्यांंचा फॉर्म्यूला

धक्कादायक व्हायरल व्हिडीओ

रीनानं व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की, तिचं जिथं लग्न होत आहे तिथं मुलींना कोणताही हक्क नाही आहे. उघड्यावर मुली शौचास जातात, त्यांना शिक्षणाचा अधिकार नाही. रीनानं असेही सांगितले की, ती सर्वांपासून लपून व्हिडीओ तयार करत आहे. मुख्य म्हणजे ही मुलगी धौलपूरमधील पोलीस चौकीत कार्यरत उपनिरीक्षक सिंग यांची मुलगी आहे. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासकीय कर्मचार्यांकमध्ये संतापाचे वातावरण आहे.

व्हिडीओ व्हाय़रल झाल्यानंतर पोलीस पोहचले घरी

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हर्सौरा पोलीस रीनाच्या घरी पोहोचली आणि कुटूंबाला हे लग्न थांबवण्यास सांगितले. अलवर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या 22 वर्षीय रीनानं 1 जुलैला होणारे लग्न थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या नावांना संबोधित करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. हा व्हिडिओ प्रसिद्ध होताच प्रशासकीय कर्मचार्यां मध्ये खळबळ उडाली आहे. यानंतर पोलिस प्रशासन मुलीच्या घरी पोहोचले.

वाचा-धक्कादायक! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची आत्महत्या, 'या' कारणासाठी संपवलं आयुष्य

अखेर लग्न मोडले

पोलीस नियंत्रण कक्षाकडून त्यांना या प्रकरणाची माहिती आल्याचे हर्सोरा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सत्यनारायण यांनी दिली. माहिती मिळाल्यानंतर ते गावी पोहोचले आणि तेथे माहिती घेतली असता तरुणीचे वडील धोलपूरमधील पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक आहेत. त्याचवेळी मुलीचे आजोबा, काका आणि आई गावात सापडले. यावेळी तरुणीच्या वडिलांची विचारपूस केल्यानंतर त्यांनी सर्वांच्या संमतीने हे लग्न रद्द करण्यात आल्याचेही सांगितले. इतकेच नाही तर 1 जुलै रोजी झालेला विवाह रद्द झाल्याचे संपूर्ण प्रकरण लेखी कुटुंबांकडून घेण्यात आले आहे.

वाचा-उंची लहान, किर्ती महान!भारतीय सेनेमध्ये रूजू होण्याचं स्वप्न जिद्दीने केलं पूर्ण

संपादन-प्रियांका गावडे.

First published: June 18, 2020, 10:11 AM IST

ताज्या बातम्या