Home /News /pune /

पुण्यात कम्युनिटी स्प्रेडचा धोका टाळण्यासाठी अनेक परिसर सील

पुण्यात कम्युनिटी स्प्रेडचा धोका टाळण्यासाठी अनेक परिसर सील

लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे पुण्यातल्या रस्त्यांवर असा शुकशुकाट पाहायला मिळत होता. पण आता कोरोनाची धास्ती घेतलेल्या पुण्याबाहेरच्या लोकांनी स्टेशनवर केलेल्या गर्दीचं वेगळंच चित्र दिसत आहे.

लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे पुण्यातल्या रस्त्यांवर असा शुकशुकाट पाहायला मिळत होता. पण आता कोरोनाची धास्ती घेतलेल्या पुण्याबाहेरच्या लोकांनी स्टेशनवर केलेल्या गर्दीचं वेगळंच चित्र दिसत आहे.

पुण्यात कोरोना बळींची संख्या 20 झाली आहे. कम्युनिटी ट्रान्समिशन टाळण्यासाठी आता कडक निर्बंध घालण्यात आले आहे. पुण्यातले कुठले भाग सील आहेत?

    पुणे, 8 एप्रिल : पुण्यात कोरोनाचा कोरोनाचा विळखा वाढतो आहे. काल एका दिवला 10 मृत्यू झाले. कोरोनाग्रस्तांची संख्याही वाढते आहे. त्यामुळे पुण्याचे अनेक परिसर खबरदारीचा उपाय म्हणून सील करण्यात आले आहेत. मध्य पुण्याचा बहुतेक भाग सील केला आहे. शिवाय कोंढवा परिसरातही अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुण्यात काल गेल्या 24 तासांमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला होता. आज पुन्हा मृतांची संख्या 2ने वाढली आहे. पुण्यात कोरोनाबाधित मृतांची संख्या 20 वर गेली असून रुग्णांची संख्या 204 वर पोहोचली आहे. मृतांमध्ये एक बारामती तर उरलेले पुणे महापालिका हद्दीतील मृत्यू आहेत. तर शहरात 168, पिंपरी चिंचवड 22, ग्रामीण 14 अशी एकूण 204 रुग्ण संख्या नोंदवली गेली आहे. पूर्व पुण्याच्या परिसरात आणि सिंहगड रोड परिसरात कोरोनाचे अधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तो संपूर्ण परिसर सील केला आहे. आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिलेल्या आदेशानुसार, पूर्व पुण्याचे भवानी पेठ, नाना पेठ, कासेवाडी, गुलटेकडी, पुणे स्टेशन परिसर हे भाग पूर्णपणे सील करण्यात आले आहेत. या परिसरात कोरोनाव्हायरसचा प्रदुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे कम्युनिटी स्प्रेडचा धोका लक्षात घेऊन या परिसरातली वर्दळ पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी असा आहे नरेंद्र मोदींचा ‘मास्टर प्लॅन’ मध्य पुण्याचा साधारण 20 किलोमीटरचा परिसरात येणारे छोटे रस्ते बंद करण्यात आले आहेत. मुख्य रस्त्यांवर वाहतूक पोलीस तैनात आहेत आणि अत्यावश्यक गोष्टींसाठीच या रस्त्यावरून वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. महर्षी नगर, मुकुंद नगर, स्वारगेट, घोरपडी, खडक पोलीस स्टेशन, शुक्रवार पेठ, रविवार पेठ, शनिवार पेठ, भवानी पेठ, रास्ता पेठ, मंगळवार पेठ, सोमवार पठे, नाना पेठ, कसबा पेठ, नारायण पेठ, कासेवाडी, सॅलिसबरी पार्क हा भाग बंद आहे. शिवाय कोंढव्याचे बहुतेक भाग सील करण्यात आले आहेत. 'तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवू शकता;आम्ही नाही', मुंबई पोलिसांचा 'हा' VIDEO पाहाच नागरिकांनी अत्यंत आवश्यक असेल तरच बाहेर पडावं, असं आवाहन करण्यात येत आहे. शिवाय प्रत्येकाने मास्क लावून किंवा रुमालाने नाक आणि तोंड बांधूनच बाहेर पडावं लागणार नाही. मास्क नसेल तर अटकही होऊ शकते. पुण्यात कम्युनिटी स्प्रेडिॆगचा धोका, रॅपिड रँडम टेस्टची नागरिकांची मागणी
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus, Pune (City/Town/Village)

    पुढील बातम्या