पुण्यात कम्युनिटी स्प्रेडिॆगचा धोका वाढल्याची भीती, रॅपिड रँडम टेस्टची नागरिकांची मागणी

पुण्यात कम्युनिटी स्प्रेडिॆगचा धोका वाढल्याची भीती, रॅपिड रँडम टेस्टची नागरिकांची मागणी

परदेशातून आलेले अनेक जण होम क्वारंटाईन होण्याऐवजी बिनदास्तपणे समाजात वावरले आणि त्यातूनच पुण्यात कम्युनिटी स्प्रेडिॆगचा धोका वाढल्याची भीती व्यक्त होते आहे.

  • Share this:

पुणे, 09 एप्रिल : पुण्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पालिकेनं कोरोनाची रॅपिड रँडम टेस्ट घ्यावी अशी मागणी आता पुणेकरांमधून पुढे येऊ लागली आहे. कारण परदेशातून आलेले अनेक जण होम क्वारंटाईन होण्याऐवजी बिनदास्तपणे समाजात वावरले आणि त्यातूनच पुण्यात कम्युनिटी स्प्रेडिॆगचा धोका वाढल्याची भीती व्यक्त होते आहे. म्हणूनच नेमकी परिस्थिती जाणून घेण्यासाठी पालिकेनं रँडम कोरोना टेस्टिंग करावी अशी मागणी राजेंद्र कोंढरे यांनी केली आहे.

पुणे शहरातील सील केलेल्या परिसरात व ज्या भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत अशा भागात 'rapid random test' घेण्याबाबत व ड्रोन camera द्वारे परिसरावर लक्ष ठेवणेबाबत विनंती करण्यात आली आहे. कोरोन विषाणूचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टिकोनातून निर्णायक टप्प्यावर आलो असून पुढचा काळही तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे संचारबंदीच्या काळात सील केलेल्या परिसरात ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे.

रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करा, विनाकारण फिरणाऱ्यांना तात्काळ स्थानबद्ध करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांचे प्रमाण पुण्यात जास्त आहे. हे नागरिक वेगवेगळ्या देशातून आलेले आहेत. जागतिक आरोग्य संघटना व इतर संस्थाच्या अभ्यासातून असे निदर्शनात आले आहे की covid 19 या आजाराशी संबंधित असणाऱ्या विषाणूचे 10 प्रकारचे स्ट्रेन्स आहेत व त्यांमध्ये वैविध्य दिसून येत आहेत.

पुण्यात अनेक देशातून नागरिक आलेले असल्याने नक्की कोणत्या प्रकारचे strains या रुग्णांमध्ये आहेत याची तपासणी व ते कोणत्या प्रकारे लक्षणे दाखवतात याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. तसेच विविध संस्थांच्या अभ्यासातून हे निदर्शनात आले आहे की या विषाणूमध्ये साधारणतः 15 दिवसांनी उत्परिवर्तन होत आहे. तरी पुण्यातून वेगवेगळ्या देशातून आलेल्या नागरिकांची ते ज्या देशातून असले आहेत या नुसार लक्षणांची तपासणी होणे व संबंधितांमध्ये संसर्ग आढळल्यास त्यांची वेगवेगळी नोंद ठेवणे आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे काही संघटनांशी संबंधित 50 व्यक्ती बेपत्ता असल्याची माहिती आहे. त्यांनी त्यांचे मोबाईल स्वीच ऑफ ठेवल्याची माहिती मिळत आहे. या व्यक्ती पुण्यामध्ये पण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच पुण्यातील ज्या भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत अश्या भागात Rapid Random Test घेण्यात याव्यात त्यास अटकाव करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

जेणेकरून कोरोना बाधित रुग्णांचे लवकरात लवकर अलगीकरण करता येणे शक्य होईल. यासाठी प्रभाग निहाय प्रत्येक घरातून माहिती घेण्यात यावी. ही माहिती घेण्यासाठी स्थानिक स्वयंसेवक व आवश्यक तेथे पोलिसांची मदत घ्यावी. तसेच कोरोना बाधित रुग्णाच्या 100 मीटर परिसरातील सर्व नागरिकांची तात्काळ आरोग्य तपासणी करण्यात यावी अशी मागणी पुणेकरांनी मागितली आहे.

पुण्यातील कोरोनाचे महत्त्वाचे अपडेट

- एकूण कोरोना मृत्यू - 18

- काल दिवसभरात 10 जण दगावले

- काल दिवसभरात 36 नवे रूग्ण

- पुणे विभागातील कोरोना पॉजिटिव्ह 229

- पुणे जिल्हा कोरोना पॉजिटिव्ह 197

- पणे शहरात काल पोलीस आयुक्ताकडून पथसंचलन

- पुणेकरांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन

- पालिकेकडून पुणे शहरात 25 फ्लू क्लिनिक सुरू करणार

- पुणे जिल्ह्यात आजपासून सर्वांनाच मास्क वापरणं बंधनकारक

- पुणेकरांकडून रॅपिड रँडम टेस्टची मागणी

संकलन, संपादन - रेणुका धायबर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2020 07:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading