जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / 'तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवू शकता;आम्ही नाही', लॉकडाऊनमध्ये मुंबई पोलिसांनी शेअर केला VIDEO

'तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवू शकता;आम्ही नाही', लॉकडाऊनमध्ये मुंबई पोलिसांनी शेअर केला VIDEO

रेल्वे पहिल्याच बैठकीत 16 कंपन्यांच्या प्रतिसादामुळे खूश आहे. 12 ऑगस्ट रोजी दुसऱी बैठक आयोजित केली जाणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपन्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न नफ्याचा आहे.

रेल्वे पहिल्याच बैठकीत 16 कंपन्यांच्या प्रतिसादामुळे खूश आहे. 12 ऑगस्ट रोजी दुसऱी बैठक आयोजित केली जाणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपन्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न नफ्याचा आहे.

जे लॉकडाऊनला कंटाळले आहेत त्यांच्यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला मुंबई पोलिसांबद्दल अभिमान नक्कीच वाटेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 09 एप्रिल : लॉकडाऊन जरी कोरोनाचे (Coronavirus) संक्रमण थांबवण्यासाठी आवश्यक असेल, तरी अनेकांना घरी बसून कंटाळा आला आहे. प्रत्येकजण लॉकडाऊनमुळे वैतागला आहे. याबाबत अनेक मीम्स शेअर करण्यात आले आहेत. पण कोरोनाशी दोन हात करण्यासाठी अनेक कोरोना कमांडो असे आहेत की ज्यांना एकही दिवस सुट्टी मिळाली नाही. खासकरून ‘ऑन ड्युटी 24 तास’ काम करणारे पोलीस. अनेकजण वर्क फ्रॉम होम करत आहेत, काहींना तर सुट्ट्याच मिळाल्या आहेत. त्यामुळे कुटुंबाबरोबर अधिक वेळ घालवता येत आहे. पण पोलीस आपलं कर्तव्य बजावण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. आपलं घरदार विसरून आपला हा रक्षणकर्ता काम करत आहे. कोरोनामुळे त्यांना घरच्यांबरोबर मिळत असलेला वेळही मिळत नाही आहे. (हे वाचा- वडिलांच्या मृत्यूनंतर सुट्टी न घेता कोरोनाबाधितांसाठी जिल्हाधिकारी कामावर रूजू ) जे लॉकडाऊनला कंटाळले आहेत त्यांच्यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police)  एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये कर्तव्य बजावत असणाऱ्या काही पोलिसांच्या प्रतिक्रिया दाखवण्यात आल्या आहेत. यातून त्यांना किती मनापासून घरी राहायचं आहे, त्यांना कुटुंबाची किती आठवण येत आहे हे त्यांनी सांगितलं आहे. (हे वाचा- केंद्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यांसाठी COVID-19 इमरजन्सी पॅकेजला मंजूरी) मुंबई पोलिसांनी या व्हिडीओला असं कॅप्शन दिलं आहे की, ‘असं वाटतंय की लॉकडाऊन संपतच नाही आहे. कल्पना करा आम्ही घरी असतो तर काय काय केलं असतं.’ मुंबई पोलिसांचा हा व्हिडीओ 5 लाखांहून अधिक ट्वीटर युजर्सनी पाहिला आहे.

जाहिरात

या व्हिडीओमध्ये पोलिसांनी ते जर घरी असते तर काय काय केलं असतं, याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सर्वांनी मुलं, बायको, नवरा यांच्याबरोबर वेळ घालवला असता, पुस्तकं वाचली असती अशी उत्तर दिली आहेत. दरम्यान या सर्व गोष्टी आज घरी बसलेल्या प्रत्येकाच्या नशिबात आहे. प्रत्येकजण कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहे. मग लॉकडाऊन कधी संपणार याचा विचार न करता मिळालेला वेळेचा सदुपयोग करणं केव्हाही योग्य! निदान आपल्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांसाठी तरी सर्वांना घरीच थांबणं बंधनकारक आहे. संपादन- जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात