पुणे, 23 जुलै: छत्रपती शिवाजी महाराजांनी पेक्षा आमच्यासाठी कोणीही मोठा नाही. शिवाजी महाराज राष्ट्रपुरुष असल्यामुळे त्यांचा दिल्लीच्या संसदेत सुद्धा जयघोष झाला पाहिजे. मात्र जय भवानी, जय शिवराय…!! घोषणा दिल्यानंतर ज्या शिवद्रोह्याना पोटात आग लागली. त्यांना समाज कधीही माफ करणार नाही. रायगडावर जाऊन छत्रपतीच्या समाधीसमोर नाक घासलं गेलं. छत्रपतींचा आशिर्वाद चला देऊ मोदींना साथ…! अशी घोषणा देऊन भाजपने शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून महाराष्ट्रात भाजपने मतांची भीक मागितली आणि त्यात मतांच्या जोरावर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. छत्रपती किंवा छत्रपतींच्या वंशाचा अपमान संभाजी ब्रिगेड खपवून घेणार नाही. हेही वाचा… मोठी बातमी! घरगुती गणेशोत्सव साजरा करण्याबाबत BMC नं जारी केली गाईडलाईन व्यंकय्या नायडू संसदेच्या सभागृहांमध्ये सर्वोच्च खूर्चीवर बसले आहेत. ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन म्हणून छत्रपतींचा आणि त्यांच्या वंशजांचा अपमान केल्याप्रकरणी व्यंकय्या नायडू इतर नेत्यांनी यांनी महाराष्ट्रासह देशाची माफी मागितली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका संभाजी ब्रिगेडनं घेतली आहे. संसदेचे सभागृह जागेवर उभा आहे, ती जागा सुभेदार मल्हारराव होळकर यांनी दान केलेली जमीन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मराठा साम्राज्याच्या कर्तृत्वाचा वसा आणि वारसा जगाला प्रेरणा देणारा आहे. त्यामुळे दान केलेल्या जमिनीच्या सभागृहात छत्रपतींचा अपमान हा शिवद्रोह आहे. म्हणून या विरोधात संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने ‘एक लाख पत्र’ व्यंकय्या नायडू यांना आम्ही पाठवणार आहोत, असं संभाजी ब्रिगेडचे नेते विकास पासलकर, जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, सचिव महादेव मातेरे, भोर तालुकाध्यक्ष गणेश चऱ्हाटे, विराज तावरे, विकास मोरे यांनी म्हटलं आहे. हेही वाचा… तस्करांचा उच्छाद! महिला तहसीलदारच्या अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न जय जिजाऊ… जय शिवराय…, जय भवानी… जय शिवराय…, छत्रपती शिवाजी महाराज की… जय.. या घोषणा नसून एक प्रेरणादायी जयजयकार आहे. हे काँग्रेस, भाजप आणि इतर पक्षांनी लक्षात घ्यावे, असंही संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.