जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मोठी बातमी! घरगुती गणेशोत्सव साजरा करण्याबाबत BMC नं जारी केली गाईडलाईन

मोठी बातमी! घरगुती गणेशोत्सव साजरा करण्याबाबत BMC नं जारी केली गाईडलाईन

मोठी बातमी! घरगुती गणेशोत्सव साजरा करण्याबाबत BMC नं जारी केली गाईडलाईन

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने घरगुती गणेश भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गाईडलाईन जारी केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 जुलै: संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. देशात सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात आहे. त्या मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सगळ्यात जास्त आहे. गणेशोत्सव जवळ आला आहे. मात्र, यंदाच्या गणेशोत्सावावर कोरोनाचं सावट असणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने घरगुती गणेश भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गाईडलाईन जारी केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गाईडलाईनचं पालन करावे, असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे. याआधी महापालिकेनं सार्वजनिक गणेश मंडळासाठी गाईडलाईन जारी केल्या होत्या. हेही वाचा… पुणेकरांची सुटका नाहीच! कोरोनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वाचे आदेश काय आहेत गाईडलाईन… -घरगुती गणेशमूर्तींचे आगमन मिरवणुकीच्या स्वरूपाचे नसावे. आगमनासाठी जास्तीत-जास्त 5 व्यक्तिंचा समूह असावा. आगमनप्रसंगी मास्क/शिल्ड, सॅनिटायझर, सामाजिक अंतर इत्यादी स्वसंरक्षणाची साधने काटेकोरपणे वापरण्यात यावीत. -घरगुती गणेशोत्सवासाठीची मूर्ती शक्यतो शाडूची असावी व या मूर्तीची उंची दोन फूटापेक्षा जास्त असू नये किंवा शक्य असल्यास यावर्षी पारंपरिक शाडूच्या गणेशमूर्तीऐवजी घरात असलेल्या धातू / संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. जेणेकरुन, आगमन / विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वतःचे / कुटुंबियांचे ‘कोविड-19’ साथ रोगापासून संरक्षण करणे शक्य होईल. -घरगुती गणेशमूर्तींची स्थापना करणा-या भाविकांनी दर्शनास येणा-या व्यक्तिंना मास्क परिधान करण्याचा आग्रह धरावा. तसेच त्यांच्यासाठी सॅनिटायझरची व्यवस्थाा करावी. -भाविकांनी स्थापन केलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास या मूर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव किंवा 2021 च्या भाद्रपद महिन्यात पुढील वर्षीच्या विसर्जनाच्या वेळीदेखील करता येणे शक्य आहे. (त्यासाठी मूर्तीचे पावित्र्य राखणेसाठी पवित्र वस्त्रात गुंडाळून घरीच मूर्ती जतन करुन ठेवता येईल) -गणेशमूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. -गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या-घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी मूर्तीचे विसर्जन करावे. -विसर्जनाच्या वेळी पाच व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्ती असू नयेत. -नैसर्गिक विसर्जन स्थळांवर विसर्जनासाठी जाणे शक्यतो टाळावे. हेही वाचा… धक्कादायक! कोरोनाबाधित व्यक्तीच्या पार्थिवाची अवहेलना, लोकांनी अंत्यविधीच रोखला -घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करताना, संपूर्ण चाळीतील / इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढू नये. -विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जनस्थळी कमीत-कमी वेळ थांबावे. विसर्जनप्रसंगी मास्क / शिल्ड इत्या्दी स्वसंरक्षणाची साधने काटेकोररित्या वापरावीत. -शक्यतो लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जावू नये. -बृहन्मुंबई महानगरपालिका / पोलिस प्रशासन यांनी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. -घर / इमारत गणेशोत्सव कालावधीत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यास प्रतिबंधित क्षेत्र नियमांचे पालन करावे. -उत्सव प्रसंगी अशी कोणतीही कृती करु नये, जेणेकरुन कोरोना विषाणुचा फैलाव होईल. अन्यथा अशा व्यक्ती साथरोग कायदा 1897, आपत्ती निवारण कायदा 2005 व भारतीय दंड संहिता 1860 कायद्यान्वये कारवाईस पात्र राहतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात