• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • अजित पवारांचा ड्रीम प्रोजेक्ट 'पुणे रिंगरोड'ला शेतकऱ्यांचा का होतोय तीव्र विरोध? वाचा ग्राऊंड रिपोर्ट 

अजित पवारांचा ड्रीम प्रोजेक्ट 'पुणे रिंगरोड'ला शेतकऱ्यांचा का होतोय तीव्र विरोध? वाचा ग्राऊंड रिपोर्ट 

पुणे रिंगरोडला पूर्व हवेली तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी तीव्र विरोध सुरू केला... काही झालं तरी रिंगरोडला जमीन देणार नाही, ?

  • Share this:
पुणे, 11 जून : पुणे रिंग रोडच्या (Pune Ring Road Project) भूसंपादनाची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली खरी पण पूर्व हवेली तालुक्यातील (Haveli Tehsil) गावांचा या रिंगरोडला तीव्र विरोध (Villagers oppose project) होत आहे. अजित पवारांनी मात्र हा प्रोजेक्ट होणारच अशी भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सरकारने अशीच दडपशाही सुरू ठेवली तर खेड शिवापूर टोलनाक्यावर हायवे रास्तारोको आंदोलन करू, अशा इशारा या दहा गावातील रिंगरोडग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे. पुणे रिंगरोड हा खरंतर उपमुख्यमंञी अजित पवारांचा ड्रीम प्रोजेक्ट (Ajit Pawar dream project)... पण त्यालाच पूर्व हवेली तालुक्यातील गावांनी विरोध सुरू केला आहे. पण तरीही प्रशासन पोलीस बंदोबस्त लावून रिंगरोडची मोजणी करत आहे. प्रशासनाच्या याच दडपशाहीला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. आमच्या बागायती जमीनी रिंग रोड रस्त्यात गेल्यातर आम्ही जगायचं कसं? मोबदल्यातून मिळणारे पैसे आम्हाला असे किती दिवस पुरणार? असा प्रश्न सरपंच अण्णा महाडिक यांनी केलाय. तेच या पुणे रिंगरोड विरोधी कृती समितीचे नेतृत्व करत आहेत. अवघ्या पाव टक्का रुग्णवाढीने रोखला पिंपरी-चिंचवडकरांचा मार्ग, निर्बंधात आणखी शिथिलता नाही पुणे शहरातील वाहतुकीचा ताण कमी व्हावा म्हणून शासनाने एमएसआरडीसी आणि पीएमआरडीएमार्फत 170 किमी लांबी आणि 110 मी रुंदीचा रिंगरोड पुणे शहराच्या चौफेर - गोलाकृती भागात बांधायला घेतला आहे. या प्रकल्पाचा खर्च अंदाजे 17 हजार कोटींच्या घरात जाणार असून त्यासाठी पुणे शहराच्या चहुबाजुच्या हवेली, मुळशी, भोर, मावळ आणि खेड या 5 तालुक्यातील अंदाजे 836 हेक्टर जमिन अधिगृहित करावी लागणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना नवीन भूसंपादन कायद्यानुसार रेडी रेकनरच्या चौपट मोबदलाही देण्यात येणार आहे. एवढं करूनही कोणाचा विरोध असेलच तर प्रशासन शेतकऱ्यांशीही चर्चा करेल पण रिंगरोड हा होणारच, अशी ठाम भूमिका अजित पवारांनी घेतली आहे. या पुणे रिंगरोडला प्रामुख्याने खेड शिवापूर नजीकच्या रहाटवडे, रांझे, शिंदवणे तसंच केळवडे, कांजळे, खोपी, कल्याण, तरडे, कुसगाव या गावांमधून तीव्र विरोध सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकार पुणे रिंगरोडच्या भूसमपादनाचा तिढा नेमका कसा सोडवतंय हेच पाहायचंय?
Published by:News18 Desk
First published: